रविवार, ४ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम• पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन• मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार• कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब• सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे• चक्रीवादळासारख्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज• शेतक-यांच्या डोळ्यात वर्षभराची भातपीकाची बेगमी नष्ट झाल्याची भिती - हर्षदा वाळके• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम• पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन• मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार• कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब• सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे• चक्रीवादळासारख्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज• शेतक-यांच्या डोळ्यात वर्षभराची भातपीकाची बेगमी नष्ट झाल्याची भिती - हर्षदा वाळके

पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन

पर्यटन विकासाला मिळणार नवी दिशा; १०० लाख रुपयांच्या निधीतून गार्डनची निर्मिती

📅 ४ ऑक्टोबर, २०२६👁 ११ब्रेकिंग
पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन

*कोंकण एक्सप्रेस*

*पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन*

*पर्यटन विकासाला मिळणार नवी दिशा; १०० लाख रुपयांच्या निधीतून गार्डनची निर्मिती*

*देवगड :प्रतिनिधी*

किल्ला, खाडी, समुद्रकिनारा आणि पवनचक्की गार्डनमुळे देवगडमध्ये साकारणार मोठा पर्यटन बेल्ट

देवगड : देवगड शहराच्या पर्यटन विकासाला आणखी एक नवी दिशा मिळणार असून, ऐतिहासिक देवगड किल्ल्याच्या खंदकांमध्ये आकर्षक गार्डन साकारण्यात येणार आहे. सुमारे १०० लाख रुपयांच्या निधीतून हे गार्डन विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून हा महत्त्वाकांक्षी पर्यटनविकासाचा उपक्रम आकार घेत आहे.

देवगड किल्ल्याच्या खंदकांमध्ये गार्डन वसविण्याची संकल्पना अत्यंत आकर्षक असून, यामुळे शहराच्या पर्यटन वैभवात आणखी भर पडणार आहे. हे गार्डन शासकीय जमिनीवर साकारले जाणार असल्याने जमीन उपलब्धतेची कोणतीही अडचण नसल्याचे सांगण्यात येत आहे.

समुद्राचे विहंगम दृश्य ठरणार प्रमुख आकर्षण

किल्ल्याच्या खंदकातून समुद्राचे दिसणारे विहंगम दृश्य हे या नव्या गार्डनचे विशेष आकर्षण ठरणार आहे. ऐतिहासिक वास्तू, हिरवाई, समुद्राचे निसर्गरम्य दृश्य आणि आकर्षक गार्डन यांचा अनोखा संगम पर्यटकांना अनुभवता येणार आहे. त्यामुळे या गार्डनमुळे देवगडमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होण्याची शक्यता आहे.

देवगडचा ऐतिहासिक किल्ला आणि त्यालगतची देवगड खाडी यामुळे या परिसराला आधीपासूनच पर्यटनाच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. आता किल्ल्याच्या खंदकातील गार्डनची भर पडल्याने या संपूर्ण परिसराचे पर्यटनमूल्य आणखी वाढणार आहे.

पवनचक्की गार्डननंतर आणखी एका पर्यटनस्थळाची भर

देवगडमध्ये यापूर्वी साकारण्यात आलेल्या पवनचक्की गार्डनने महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर देवगडची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारण्यात येणारे हे नवे गार्डन पर्यटकांसाठी आणखी एक आकर्षण ठरणार आहे.

एका बाजूला सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या इतिहासाशी जोडलेला देवगडचा किल्ला, त्यालगत देवगडची खाडी, किल्ल्याच्या खंदकातील प्रस्तावित गार्डन, पुढे देवगडचा समुद्रकिनारा आणि त्याच्या परिसरात पवनचक्की व पवनचक्की गार्डन, अशी पर्यटनस्थळांची साखळी देवगड शहरात तयार होत आहे. हा निधी जिल्हा नियोजन मधून मंजूर झाला आहे

यामुळे किल्ला–खाडी–गार्डन–समुद्रकिनारा–पवनचक्की गार्डन असा मोठा पर्यटन बेल्ट देवगड शहरात विकसित होण्यास मदत होणार आहे. या माध्यमातून पर्यटकांचा देवगडकडे वाढता ओढा निर्माण होण्यासोबतच स्थानिक हॉटेल, खानावळ, वाहतूक, पर्यटन सेवा आणि छोट्या व्यावसायिकांनाही त्याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

देवगडच्या ऐतिहासिक आणि नैसर्गिक पर्यटनस्थळांना आधुनिक सुविधांची जोड देत पर्यटन विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने किल्ल्याच्या खंदकातील हे गार्डन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

देवगड मधील अधिक बातम्या

अधिक पहा →