शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार• कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब• सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे• चक्रीवादळासारख्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज• शेतक-यांच्या डोळ्यात वर्षभराची भातपीकाची बेगमी नष्ट झाल्याची भिती - हर्षदा वाळके• सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे उद्या जिल्हा दौऱ्यावर; कणकवलीत साधणार जनतेशी संवाद• शेकडो विद्यार्थ्यांसोबत एकाचवेळी बुद्धिबळाचा डाव• कोकणातील कबुलायतदार जमिनींचा प्रश्न डिसेंबरपूर्वी मार्गी लावणार - महसूलमंत्री• चाफेड गावात स्वतंत्र पोस्ट आणि तलाठी कार्यालय सुरु झाल्याने गावाची विकासाकडे झेप ; सभापती गणेश राणे• कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी ‘लव्ह जिहाद’चा डाव उधळला• मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार• कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब• सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे• चक्रीवादळासारख्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज• शेतक-यांच्या डोळ्यात वर्षभराची भातपीकाची बेगमी नष्ट झाल्याची भिती - हर्षदा वाळके• सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे उद्या जिल्हा दौऱ्यावर; कणकवलीत साधणार जनतेशी संवाद• शेकडो विद्यार्थ्यांसोबत एकाचवेळी बुद्धिबळाचा डाव• कोकणातील कबुलायतदार जमिनींचा प्रश्न डिसेंबरपूर्वी मार्गी लावणार - महसूलमंत्री• चाफेड गावात स्वतंत्र पोस्ट आणि तलाठी कार्यालय सुरु झाल्याने गावाची विकासाकडे झेप ; सभापती गणेश राणे• कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी ‘लव्ह जिहाद’चा डाव उधळला

सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे

पावशी, मुळदे येथे मा.आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाला शुभारंभ

📅 ३ ऑक्टोबर, २०२६👁 १ब्रेकिंग#वैभव नाईक#शिवसेना
सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे

*कोंकण एक्सप्रेस

*सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे

*पावशी, मुळदे येथे मा.आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाला शुभारंभ

*कुडाळ : प्रतिनिधी

दुष्काळाच्या संकटात पाण्याचे साठे निर्माण करण्यासाठी शिवसेनेचा पुढाकार

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसैनिकांच्या श्रमदानातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात १०० वनराई कच्चे बंधारे बांधण्यात येणार आहेत. त्याचा शुभारंभ आज पावशी, मुळदे येथे माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. त्याबद्दल तेथील ग्रामस्थांनी वैभव नाईक व शिवसैनिकांचे आभार मानले.

यावेळी मा.आ. वैभव नाईक म्हणाले, चालू वर्षी पावसाचे प्रमाण कमालीचे घटल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील काळात पाण्याचा तुटवडा भासणार असल्याने नागरिकांना आवश्यक पाण्याचे साठे निर्माण करण्यासाठी शिवसेनेच्या माध्यामातून १०० वनराई कच्चे बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामध्ये आज दोन ठिकाणी बंधारे बांधण्यात आले आहेत. शिवसेना नेहमीच ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या ब्रीद वाक्याप्रमाणे कार्यरत असून सामाजिक भावनेतून हा उपक्रम होत असल्याचे वैभव नाईक यांनी सांगितले.

याप्रसंगी पावशी येथे शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख बाळा कोरगावकर, उपतालुकाप्रमुख बाळा पावसकर, जि. प. सदस्य गंगाराम सडवेलकर, पंचायत समिती सदस्य,गटनेते योगेश धुरी,अमित राणे, उपविभाग प्रमुख सचिन ठाकूर, पावशी उपसरपंच लक्ष्मीकांत तेली,माणगाव उपसरपंच बापू बागवे, मनीष तोटकेकर, बाबू वायंगणकर, राजन तवटे, शैलेश घाडी, जयराम वराडकर, प्रसाद शेलटे,बाबा पावसकर,बाबा खोत, मुळदे येथे उपसरपंच प्रवीण पालव, भिवा पालव, माजी सरपंच संजय पालव, ग्रा.पं. सदस्य अपूर्वा पालव, शशिकांत पालव आदी उपस्थित होते.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कुडाळ मधील अधिक बातम्या

अधिक पहा →