बुधवार, १८ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी• विशालभाई परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!• दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानतर्फे १८ फुटी गणेशमूर्ती उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते अनावरण; तुळशीविवाहापर्यंत दर्शनाची संधी• *कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर• तळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू• भाजपा पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी प्रस्तुत "स्वर दीपावली" मैफिलीचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन• पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्याचे आवाहन• जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक• दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त• किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश• वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी• विशालभाई परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!• दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानतर्फे १८ फुटी गणेशमूर्ती उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते अनावरण; तुळशीविवाहापर्यंत दर्शनाची संधी• *कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर• तळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू• भाजपा पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी प्रस्तुत "स्वर दीपावली" मैफिलीचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन• पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्याचे आवाहन• जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक• दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त• किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

शेतक-यांच्या डोळ्यात वर्षभराची भातपीकाची बेगमी नष्ट झाल्याची भिती - हर्षदा वाळके

*असलदे गावात लोकप्रतिनीधी भातपिक शेतक-यांच्या बांधावर *नुकसानग्रस्त शेतक-यांचे पंचनामे तातडीने करा

📅 ३ ऑक्टोबर, २०२६👁 ९ब्रेकिंग
शेतक-यांच्या डोळ्यात वर्षभराची भातपीकाची बेगमी नष्ट झाल्याची भिती - हर्षदा वाळके

*कोंकण एक्सप्रेस

*शेतक-यांच्या डोळ्यात वर्षभराची भातपीकाची बेगमी नष्ट झाल्याची भिती - हर्षदा वाळके

*असलदे गावात लोकप्रतिनीधी भातपिक शेतक-यांच्या बांधावर

*नुकसानग्रस्त शेतक-यांचे पंचनामे तातडीने करा

*कणकवली: प्रतिनिधी

अल निनोच्या वादामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले असून राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सुचनेनुसार तालुक्यातील आम्ही शेतक-यांच्या बांधावर जात आहोत. भातपीक नुकसानग्रस्त गावांमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही असलदे गावातील शेतक-यांच्या बांधावर गेलो. भीषण अशी परिस्थिती दिसून येत आहे. शेतक-यांची वर्षभराची भातपीकाची बेगमी ही पूर्णपणे नष्ट झाल्याची भिती शेतक-यांच्या डोळ्यात दिसत असल्याची प्रतिक्रिया सभापती हर्षदा वाळके यांनी दिली.

दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामात असलदे गावातील भातपीक नुकसाग्रस्त शेतक-याच्या बांधावर सभापती हर्षदा वाळके , जिल्हा परिषद संतोष पारकर, सरपंच चंद्रकांत डामरे, सोसायटी चेअरमन भगवान लोके या लोकप्रतिनिधींनी पाहणी केली. शेतक-यांशी संवाद साधत येत असलेल्या अडचणीबाबत चर्चा केली. यावेळी असलदेत गावठणवाडी , डामरेवाडी , मधलीवाडी , धनगरवाडी, तावडेवाडी या भागातील भातशेतीची पाहणी करण्यात आली.

यावेळी उपसरपंच सचिन परब, व्हाईस चेअरमन दयानंद हडकर, ग्रा.प.सदस्य आनंद तांबे , सोसायटी संचालक शत्रुघ्न डामरे, संतोष परब , बाबाजी शिंदे , प्रविण डगरे , अनिल नरे, मायाजी नरे, विजय खरात, विजय डामरे , विजय परब, वासुदेव दळवी, शेतकरी विनायक परब, विश्वनाथ परब, बाळा खरात , दिनेश तावडे, विजय आचरेकर, महेंद्र हडकर, ग्रामसेवक संजय तांबे, ग्रा.प. कर्मचारी मधुसुदन परब, सत्यवान घाडी, आदी उपस्थित होते. यावेळी सभापती हर्षदा वाळके यांनी असलदे गावातील सर्व शेतक-यांचे पंचनामे वेळेत पूर्ण करावेत, अशा सुचना दिल्या.

जि.प.सदस्य संतोष पारकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमी पावसामुळे मोठ्या प्रमाणात भातशेतीचे नुकसान झाले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी शेतक-यांच्या बांधावर जावून झालेल्या नुकसानीची पाहणी करावी अशा सुचना केल्या. त्यानुसार असलदे गावातील भातशेतीची पाहणी केली असता बिकट परिस्थिती आहे. शेतीत पिक न मिळाल्यास पुढील वर्ष कसे काढायचे ? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.

भगवान लोके म्हणाले, असलदे गावातील शेतक-यांचे कमी पावसामुळे भातशेती उध्दवस्त झाली आहे. पुढील वर्षभराची भाताची असलेली बेगमी पुर्णत: नष्ट झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनीधी म्हणून आम्ही सर्वजण शेतक-यांना भेटून त्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने बांधावर गेलो. भातशेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे. असलदे गावातील सर्व शेतक-यांचे पंचनामे तातडीने पूर्ण करा. शासनाच्या मदतीपासून कोणीही वंचित राहता कामा नये, अशी भूमिका आम्ही सर्वांनी मांडली.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कणकवली मधील अधिक बातम्या

अधिक पहा →