चक्रीवादळासारख्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज

*कोंकण एक्सप्रेस
*चक्रीवादळासारख्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज
*वेगुर्ले - प्रतिनिधी
वादळासारखी आपत्ती आल्यानंतर यामध्ये सर्व शासकीय यंत्रणा अलर्ट राहून आपली जबाबदारी पार पाडत असते या मध्ये जनतेनेही सहकार्य करून आपत्तीला तोंड देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी तथा निरीक्षण अधिकारी शुभांगी साठे यांनी केले
चक्रीवादळासारख्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज आहे याचे प्रात्यक्षिक कोचरा श्रीरामवाडी शेळपी येथे अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या निरीक्षणाखाली संपन्न झाले यावेळी वेंगुर्ले नायब तहसीलदार राजन गवस, सरपंच अवधूत रेगे, एन डी आर एफ कमांडर निखिल मुदळकर ,धर्मेंद्र सावडा व त्यांची टीम याशिवाय मंडल अधिकारी तलाठी महसूल विभागमहावितरण बीएसएनएल आरोग्य वैद्यकीय पथक पोलीस पाटील कोतवालआणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
जिल्ह्यातील चक्रीवादळ अतिवृष्टी मध्ये येणाऱ्या आणि समुद्राला उदान आल्यानंतर आपत्तीला सामोरे जाण्यास त्या दृष्टीने बचाव प्रात्यक्षिके जखमी ना वैद्यकीय मदत याबाबत कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी ट्रान्सफार्मरला लागलेली आग विझविणे पहिल्या मजल्यावरून अडकलेल्या मुलाला दोरीच्या साह्याने खाली उतरवणे घरगुती गॅस सिलेंडर आग लागल्यानंतर कशी विजवावी समुद्रात वाहून जाणाऱ्या व्यक्तीला वाचवून रुग्णालयात दाखल करणे इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लागलेल्या आग विजविण्यासाठी घ्यावयाची काळजी सीपीआर प्रशिक्षण रस्त्यावर पडलेले झाड घरावर पडलेले झाड बाजूला करणे आदींसह विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आले याला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला
यावेळी बोलताना अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे म्हणाल्या वादळासारखी आपत्ती आल्यानंतर यामध्ये सर्व शासकीय विभागाने अलर्ट राहणे आणि जबाबदारीनेआपत्तीला तोंड देणे गरजेचे आहे सध्या पावसाळ्यात अनेक आपत्ती त्या दृष्टीने आपल्याला बचाव कार्य करावे लागते यासाठी एनडीआर एफ सारख्या यंत्रणेच्या माध्यमातून चक्रीवादळ आणि नैसर्गिक आपत्ती अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले जाते अशा आपत्तीमध्ये नागरिकांनीही मदत करणे आवश्यक आहेआजच्या या प्रात्यक्षिक कार्यक्रमात एनडीआरएफ च्या माध्यमातून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढणे जखमींना तातडीने मदत करणे आणि बाधित भागात आवश्यक साधनसामग्री पोचविणे याबाबत एनडीआरएफ पथकाने प्रत्यक्ष बचाव कार्याचा सराव केला आपत्तीप्रसंगी उपलब्ध मनुष्यबळाचा वापर विविध विभागाच्या माध्यमातून संपर्क साधने घटनास्थळी बचाव कार्याची आखणी करणे याची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके दाखवली आरोग्य विभाग पथकाने प्राथमिक उपचार जखमींना सुरक्षित स्थलांतर करणे रुग्णालयात ठरवणे याबाबत प्रात्यक्षिक केले या प्रात्यक्षिक कार्यक्रमांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला
जाहिरातवेंगुर्ला मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वेंगुर्लेत आसोली-रांजणवाडीत बंधारा

मातीखालून सापडलेल्या सरड्याच्या अंड्यांमधून 10 पिलांचा जन्म

वेंगुर्ल्यात ‘फिटनेस आणि वेलनेस इव्हेंट २०२६’ उत्साहात

