चाफेड स्वतंत्र पोस्ट कार्यालय आणि तलाठी कार्यालयाचा 1 ऑक्टोंबर रोजी शुभारंभ

कोंकण एक्सप्रेस
चाफेड स्वतंत्र पोस्ट कार्यालय आणि तलाठी कार्यालयाचा 1 ऑक्टोंबर रोजी शुभारंभ
शिरगांव : संतोष साळसकर
देवगड तालुक्यातील चाफेड ग्रामपंचायत याठिकाणी गुरु. दि. 1 ऑक्टोंबर रोजी स. 10 वा. स्वतंत्र चाफेड पोस्ट कार्यालय आणि तलाठी कार्यालयाचा शुभारंभ आयोजित करण्यात आला आहे. याचे उदघाटन देवगड पंचायत समिती सभापती गणेश राणे यांच्या हस्ते होणार आहे.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भाजप जिल्हा सरचिटणीस तथा मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद योजनेचे सह. अध्यक्ष संदीप साटम, डाक विभागाचे सिंधुदुर्ग जिल्हा अधीक्षक एन. टी. कुरळपकर, भाजपचे युवा मोर्चा देवगड तालुका अध्यक्ष अमित साटम, जिल्हा परिषद सदस्य देवदत्त कदम, पंचायत समिती सदस्य शितल तावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष नार्वेकर, राजेंद्र शेट्ये, कुवळे तलाठी अनंत अंधारी, सरपंच साहिल पांचाळ उपसरपंच महेश राणे तंटामुक्ती अध्यक्ष तथा माझी सरपंच सत्यवान भोगले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहावे असे चाफेड ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
जाहिरात
