रविवार, ४ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम• पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन• मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार• कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब• सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे• चक्रीवादळासारख्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज• शेतक-यांच्या डोळ्यात वर्षभराची भातपीकाची बेगमी नष्ट झाल्याची भिती - हर्षदा वाळके• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम• पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन• मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार• कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब• सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे• चक्रीवादळासारख्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज• शेतक-यांच्या डोळ्यात वर्षभराची भातपीकाची बेगमी नष्ट झाल्याची भिती - हर्षदा वाळके

वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम

गांधी जयंतीचे औचित्यसाधून गोपुरी आश्रम व अनुभव शिक्षा केंद्रातर्फे आयोजन

📅 ४ ऑक्टोबर, २०२६👁 ४ब्रेकिंग
वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम

*कोंकण एक्सप्रेस*

*वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम*

*गांधी जयंतीचे औचित्यसाधून गोपुरी आश्रम व अनुभव शिक्षा केंद्रातर्फे आयोजन*

*कणकवली : संजना हळदिवे*

राष्टÑपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून गोपुरी आश्रम व अनुभव शिक्षा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गोपुरी आश्रमात आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी याने प्रथम क्रमांक पटकाविला. साधवी चेंदवणकर हिने द्वितीय तर आर्या जोईल हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. दीक्षा इस्वलकर हिने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले.

स्पर्धेचे परीक्षण गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र मुंबरकर व सचिव विनायक सापळे यांनी केले. आरंभी स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी राजेंद्र मुंबरकर, विनायक सापळे, संदीप सावंत, अर्पिता मुंबरकर, पत्रकार तुषार हजारे, यज्ञेश पोकळे आदी मान्यवर उपस्थित होते. महात्मा गांधी व कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या कार्याची माहिती राजेंद्र मुंबरकर यांनी सांगितली. यज्ञेश पोकळे यांनी सामाजिक कार्यकर्ते बाबा आढावा यांच्या जीवनकार्याची माहिती सांगितली. त्यानंतर स्पर्धकांनी वक्तृत्व स्पर्धेत गांधीजींच्या पुस्तकांतून उलगडणारे जीवन, विचार आणि कार्य, जेन-झींच्या नजरेतील गाधीजी, सद्यस्थितीतील आंदोलनांमागील गाधींच्या अहिंसावादी सत्याग्रहांची प्रेरणा या विषयांवर उत्कृष्ट सादरीकरण केले. स्पर्धा पार पडल्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानचिन्ह, पुस्तक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा पाहण्यासाठी नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कणकवली मधील अधिक बातम्या

अधिक पहा →