रविवार, ४ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम• पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन• मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार• कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब• सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे• चक्रीवादळासारख्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज• शेतक-यांच्या डोळ्यात वर्षभराची भातपीकाची बेगमी नष्ट झाल्याची भिती - हर्षदा वाळके• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम• पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन• मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार• कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब• सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे• चक्रीवादळासारख्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज• शेतक-यांच्या डोळ्यात वर्षभराची भातपीकाची बेगमी नष्ट झाल्याची भिती - हर्षदा वाळके

ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याची काळजी घेत जीवन जगावे

ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्यावतीने सहस्रचंद्र दर्शन सोहळा उत्साहात ; ८० वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचे केले कौतुक

📅 ४ ऑक्टोबर, २०२६👁 ३
ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याची काळजी घेत जीवन जगावे

*कोंकण एक्सप्रेस*

*ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याची काळजी घेत जीवन जगावे*

*ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्यावतीने सहस्रचंद्र दर्शन सोहळा उत्साहात ; ८० वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचे केले कौतुक*

*कणकवली : संजना हळदिवे*

ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. वृध्दापकाळ पेन्शन योजना आहे. त्याचा ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा. प्रशासन म्हणून आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी आहोत. ज्येष्ठांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत आनंदी जीवन जगावे, असे आवाहन तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांनी केले.

कणकवली येथे ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्यावतीने सहस्रचंद्र दर्शन सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात 80 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तहसीलदार दिक्षांत देशपांडे, पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव, रोटरी क्लबच्या अध्यक्षा सुप्रिया नलावडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष भालचंद्र मराठे, अध्यक्ष अर्जुन राणे,उपाध्यक्ष लवू पिळणकर, सचिव प्रमोद लिमये आदी उपस्थित होते. प्रारंभी माजी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कै. मनोहर पालयेकर, कै. प्रदीप ढेकणे व अन्य ज्येष्ठ नागरिक यांच्यासह नैसर्गिक आपत्ती, विविध घटनांमध्ये निधन झालेल्या व्यक्तींना विश्वशांती प्रार्थनेतून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव म्हणाले, चोरी, छळ, फसवणूक तसेच सायबर गुन्ह्यांपासून ज्येष्ठ नागरिकांनी सावध रहावे. गुंतवणूक करताना अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये. तसेच आर्थिक व्यवहार करताना विशेष दक्षता घ्यावी.

रोटरी क्लबच्या अध्यक्षा सुप्रिया नलावडे म्हणाल्या, ज्येष्ठ नागरिकांप्रती आम्हा सर्वांना आदर आहे. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.

अध्यक्ष अर्जुन राणे म्हणाले, ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. ज्येष्ठ नागरिकांसाठी आमचा संघ कायम कार्यरत राहिल.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष लवू पिळणकर म्हणाले, गेल्या तीन वर्षांपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी हा उपक्रम राबविला जात आहे. 80 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्याचा संघाचा प्रयत्न आहे. सर्व ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचणे शक्य होत नसले तरी ज्यांची माहिती उपलब्ध होते, अशा ज्येष्ठांचा सन्मान करण्यात येतो. यापुढेही हा उपक्रम सुरू ठेवण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद लिमये यांनी केले.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कणकवली मधील अधिक बातम्या

अधिक पहा →