रविवार, २९ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• भ्रष्टाचारमुक्त कणकवली’ आणि ‘शाश्वत विकासा’चा नारा कुठे गेला?; नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांनी उत्तर द्यावे : बंडू हर्णे• मला सस्पेंड करायला नगराध्यक्षांना १० जन्म घ्यावे लागतील’; बंडू हर्णे• दुष्काळातील उपाययोजनांसह जनगणना, एसआयआर मधील कामांना प्राधान्य द्या – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे• गड-किल्ल्यांचे जतन ही सामूहिक जबाबदारी – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे• सिंधुदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यावर संविधानाचा जागर• हळवल मधलीवाडी येथील रहिवासी सुरज अविनाश राणे ( वय 27 )• नांदरुखच्या गिरोबाचा जत्रोत्सवात भाविकांची अलौट गर्दी रुद्राश जन्म नाटकाने भाविक मंत्रमुग्ध• पत्रकारांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य अधिकाऱ्याला भोवले!• निधी पुन्हा मिळाला नाही तर जि.प. वर भजनी कलाकारांचा भव्य मोर्चा काढण्याचा दिला इशारा• कलमठ ग्रामपंचायत मार्फत संविधान दिन साजरा.• भ्रष्टाचारमुक्त कणकवली’ आणि ‘शाश्वत विकासा’चा नारा कुठे गेला?; नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांनी उत्तर द्यावे : बंडू हर्णे• मला सस्पेंड करायला नगराध्यक्षांना १० जन्म घ्यावे लागतील’; बंडू हर्णे• दुष्काळातील उपाययोजनांसह जनगणना, एसआयआर मधील कामांना प्राधान्य द्या – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे• गड-किल्ल्यांचे जतन ही सामूहिक जबाबदारी – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे• सिंधुदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यावर संविधानाचा जागर• हळवल मधलीवाडी येथील रहिवासी सुरज अविनाश राणे ( वय 27 )• नांदरुखच्या गिरोबाचा जत्रोत्सवात भाविकांची अलौट गर्दी रुद्राश जन्म नाटकाने भाविक मंत्रमुग्ध• पत्रकारांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य अधिकाऱ्याला भोवले!• निधी पुन्हा मिळाला नाही तर जि.प. वर भजनी कलाकारांचा भव्य मोर्चा काढण्याचा दिला इशारा• कलमठ ग्रामपंचायत मार्फत संविधान दिन साजरा.

दुष्काळातील उपाययोजनांसह जनगणना, एसआयआर मधील कामांना प्राधान्य द्या – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

📅 २८ नोव्हेंबर, २०२६👁 ८ब्रेकिंग
दुष्काळातील उपाययोजनांसह जनगणना, एसआयआर मधील कामांना प्राधान्य द्या – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

*कोंकण एक्सप्रेस

*दुष्काळातील उपाययोजनांसह जनगणना, एसआयआर मधील कामांना प्राधान्य द्या – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

*पीक पाहणी, रोजगार हमीची कामे, बळीराजा पाणंद रस्ते, ई-केवायसी व विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा महसूल अधिकारी बैठकीत आढावा

*सिंधुदुर्ग

जनगणना आणि मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचा सध्या अंतिम टप्पा सुरू असून, हे दोन्ही विषय अत्यंत महत्त्वाचे आणि प्राधान्याचे आहेत. महसूल विभागाने या कामांमध्ये विशेष लक्ष देऊन निर्धारित कामे वेळेत पूर्ण करावीत. तसेच महसूल वसुलीमध्ये मागील वर्षाच्या कामगिरीपेक्षा यंदा अधिक वसुली करण्याचे उद्दिष्ट ठेवावे. पुढील महसूल अधिकारी आढावा बैठकीपूर्वी वसुलीच्या आकडेवारीत लक्षणीय वाढ दिसून यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सुरंगी सभागृहात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल अधिकारी आढावा बैठक झाली. यावेळी महसूल विभागाच्या विविध कामांचा, शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा तसेच जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रशासकीय विषयांचा आढावा घेण्यात आला.

जिल्हाधिकारी म्हणाल्या, जनगणना आणि मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा असल्याने या कामांकडे सर्व महसूल अधिकाऱ्यांनी प्राधान्याने लक्ष द्यावे. गौण खनिज वसुलीसह सर्व महसुली स्रोतांमधून अपेक्षित वसुली करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. महाखनिज २.० या प्रणालीच्या कामकाजालाही प्राधान्य द्यावे.

पुरवठा विभागाशी संबंधित प्रलंबित ई-केवायसी आणि आधार सीडिंगची कामे गतीने पूर्ण करावीत. रास्त भाव दुकाने, धान्य गोदामे, पेट्रोल पंप आणि गॅस एजन्सींच्या तपासण्यांची संख्या प्रत्येक तालुक्यात वाढवावी.

सध्या जिल्ह्यात दुष्काळ हा महत्त्वाचा विषय आहे. संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. रोजगार हमी योजनेतून अधिकाधिक कामे हाती घ्यावीत. जलस्रोत बळकट करणे, शोषखड्डे आणि जलतारा उभारणे कामांना गती द्यावी. यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने प्रयत्न करावेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. त्यामुळे पर्यटनस्थळे, निवास व्यवस्था आणि पर्यटनाशी संबंधित ठिकाणी पाणी बचतीबाबत जनजागृती करणाऱ्या उपाययोजना राबवाव्यात. पर्यटकांनाही पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन करावे. सीआरझेड संदर्भातील प्रकरणे आणि कामांनाही प्राधान्य देऊन त्याबाबतची कार्यवाही करावी.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत (आरटीएस) नागरिकांना अधिसूचित सेवा विहित मुदतीत उपलब्ध करून द्याव्यात. कोणत्याही अर्जदाराला विनाकारण विलंब होणार नाही, याची दक्षता घ्यावी. महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणे, न्यायालयीन कामकाज, शासकीय जमिनी, अतिक्रमणे तसेच तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयांच्या कामकाजाचा नियमित आढावा घेऊन कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीत महसूल व गौण खनिज वसुली, ई-फेरफार, लोकसेवा हक्क अधिनियम, बळीराजा पाणंद रस्ते, सामाजिक सुरक्षा योजनांची अंमलबजावणी, शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे, भोगवटदार वर्ग-२ जमिनींचे वर्ग-१ मध्ये रूपांतर, न्यायालयीन प्रकरणे आणि दुष्काळ निवारण उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

पुढील महसूल अधिकारी बैठकीपूर्वी विविध कामांतील प्रलंबितता कमी करून महसूल वसुली, योजनांची अंमलबजावणी आणि दुष्काळ निवारणाच्या कामांमध्ये ठोस प्रगती साधावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी यावेळी दिले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी शारदा पवार, प्रतिभा वराळे, नितीन राऊत, बालाजी शेवाळे, आरती देसाई यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

सिंधुदुर्ग मधील अधिक बातम्या

अधिक पहा →