ओरोसमधील विनयभंग, मारहाण व शिवीगाळ प्रकरणी संशयिताची निर्दोष मुक्तता

*कोंकण एक्सप्रेस
*ओरोसमधील विनयभंग, मारहाण व शिवीगाळ प्रकरणी संशयिताची निर्दोष मुक्तता
* मुख्य न्यायदंडाधिकारी यांचा महत्त्वपूर्ण निकाल
*बचाव पक्षाचे वकील अॅड. अशपाक शेख काम पहिले
*ओरोस : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील ओरोस येथे सुमारे चार वर्षांपूर्वी घडलेल्या विनयभंग, शिवीगाळ आणि मारहाणीच्या प्रकरणात संशयित अगस्तीन लोबो याची मा. मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. तपासातील गंभीर त्रुटी, स्वतंत्र साक्षीदारांचा अभाव आणि साक्षी-पुराव्यांमधील विसंगती लक्षात घेत ओरोस येथील मा. मुख्य न्यायदंडाधिकारी श्री. अवधूत गजानन देशिंगकर यांनी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी हा आदेश पारित केला.
काय होती नेमकी घटना?
गणपती सणासाठी फिर्यादी महिलेचे पती आणि मुलगा मुंबई व पुण्यावरून ओरोस-खिश्चनवाडी येथील घरी आले होते. ३१ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी अंगणात झाडू मारत असताना, संशयित अगस्तीन लोबो रस्त्यावर उभा राहून अश्लील शब्द बोलल्याचा व विरोध केल्यानंतर शिवीगाळ केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला होता. फिर्यादीने पती व मुलाला आवाज दिल्यावर संशयित मुलाच्या अंगावर धावून गेला आणि त्याला खाली पाडल्याचे सांगण्यात आले होते. उपस्थित नागरिकांनी मध्यस्थी करून वाद मिटवल्यानंतर याप्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सुनावणीत काय घडले?
खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले आणि मारहाण व शिवीगाळ झाल्याचा दावा करण्यात आला. मात्र, बचाव पक्षाचे वकील अॅड. अशपाक शेख यांनी हा दावा खोडून काढत महत्त्वाचे मुद्दे न्यायालयासमोर मांडले:
Bullet कथित घटनेला कोणताही स्वतंत्र किंवा त्रयस्त प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उपलब्ध नाही.
Bullet मारहाणीत वापरल्या गेलेल्या कोणत्याही हत्याराचा पुरावा न्यायालयासमोर सादर करण्यात आलेला नाही.
Bullet दोन्ही पक्षांमध्ये पूर्वीपासून दिवाणी स्वरूपाचे वाद प्रलंबित आहेत.
Bullet पोलीस तपासातील गंभीर त्रुटी आणि साक्षी-पुराव्यांमधील विसंगती त्यांनी ठळकपणे निदर्शनास आणून दिल्या.
बचाव पक्षाची टीम
बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने संशयिताची निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात आरोपीच्या वतीने अॅड. अशपाक शेख यांनी प्रभावी बाजू मांडली असून त्यांना अॅड. नामदेव मठकर, अॅड. विनय रजपूत, अॅड. कैस शेख, अॅड. भुषण कदम, अॅड. हरेश वरावडेकर आणि अॅड. आसिम मुजावर यांनी सहकार्य केले.
जाहिरातसिंधुदुर्ग मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंगफळपिकांच्या संरक्षणासाठी फ्रूट कव्हर वापरण्यास अनुदान
ब्रेकिंगउद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा कार्यक्रम
ब्रेकिंगभारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी .. मोफत पूर्वप्रशिक्षणाची संधी
ब्रेकिंग