निधी पुन्हा मिळाला नाही तर जि.प. वर भजनी कलाकारांचा भव्य मोर्चा काढण्याचा दिला इशारा

*कोंकण एक्सप्रेस
*११२ भजन मंडळांचा निधी मागे गेल्याच्या निषेधार्थ मा.आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने सिंधुदुर्ग जि. प. वर केले भजन आंदोलन
*निधी पुन्हा मिळाला नाही तर जि.प. वर भजनी कलाकारांचा भव्य मोर्चा काढण्याचा दिला इशारा
*सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधि
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ११२ भजन मंडळांचा भजन साहित्यासाठीचा निधी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदकडून अखर्चित राहील्याने तो निधी मागे गेला आहे. त्यामुळे भजन साहित्य योजनेसाठी अर्ज केलेली भजन मंडळे या योजनेपासून वंचित राहिली आहेत. त्याच्या निषेधार्थ माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर टाळाच्या गजरात धडक देत, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर लक्षवेधी भजन आंदोलन केले.
सत्ताधाऱ्यांनी मोठा गाजावाजा करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजन मंडळांसाठी भजन साहित्य वाटप करण्याची योजना जाहीर केली होती.जिल्ह्यातील शेकडो भजन मंडळांनी या योजनेसाठी अर्ज देखील केले होते. मात्र सिंधुदुर्ग जिल्हापरिषदने मंजूर निधी अखर्चित ठेवून जिल्ह्यातील भजन मंडळांची मोठी फसवणूक केली आहे.जर हा निधी पुन्हा भजन मंडळांना मिळाला नाही तर जिल्ह्यातील भजनी कलाकारांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या जान्हवी सावंत, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कणकवली तालुकाप्रमुख राजू राठोड, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, पं. स. सदस्य,गटनेते योगेश धुरी, ओरोस विभागप्रमुख रवीबुवा कदम, कसाल शहरप्रमुख नंदू आंबेरकर, ओरोस शहरप्रमुख भगवान परब, कळसुली विभाग प्रमुख बबली राणे, बंड्या कोरगावकर, गणेश मेस्त्री, बाळू पालव, रवी परब, मामा ओरोसकर, निलेश परब,अमित राणे, सदाशिव पालव आदि शिवसैनिक उपस्थित होते
जाहिरातसिंधुदुर्ग मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंग‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना - २०२६’ मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा
ब्रेकिंगकुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या विजयाला दोन वर्षे पूर्ण
ब्रेकिंगओरोसमधील विनयभंग, मारहाण व शिवीगाळ प्रकरणी संशयिताची निर्दोष मुक्तता
ब्रेकिंग