मंगळवार, २४ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• नांदगाव येथे २६ व २७ नोव्हेंबरला ५४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन• पुणे जिल्ह्यातील रिंग रोड व घाटरस्त्यांच्या कामाचा सार्वजनिक उपक्रम समितीकडून पाहणी दौरा• कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या विजयाला दोन वर्षे पूर्ण• कणकवली पंचायत समिती वर्धापन दिन उत्साहात संपन्न• वेंगुर्ल्यातील रेडी जंगल परिसरात मिळालेल्या अनोळखी मृतदेहाचे गुढ उकलले• पालकमंत्री नितेश राणे यांना आमदार म्हणून १२ वर्षे पूर्ण• डॉ. रुपेश कुमार झा जनरल सर्जन पोटातील विकार तज्ञ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल• मालवण तालुक्यातील विविध गावात हरीनाम सप्ताहांना मा.आ. वैभव नाईक यांची उपस्थिती• ओरोसमधील विनयभंग, मारहाण व शिवीगाळ प्रकरणी संशयिताची निर्दोष मुक्तता• देवगड समुद्रात मध्यरात्रीचा थरार: कर्नाटकाची हायस्पीड ट्रॉलर ‘श्री अनघा’ जप्त• नांदगाव येथे २६ व २७ नोव्हेंबरला ५४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन• पुणे जिल्ह्यातील रिंग रोड व घाटरस्त्यांच्या कामाचा सार्वजनिक उपक्रम समितीकडून पाहणी दौरा• कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या विजयाला दोन वर्षे पूर्ण• कणकवली पंचायत समिती वर्धापन दिन उत्साहात संपन्न• वेंगुर्ल्यातील रेडी जंगल परिसरात मिळालेल्या अनोळखी मृतदेहाचे गुढ उकलले• पालकमंत्री नितेश राणे यांना आमदार म्हणून १२ वर्षे पूर्ण• डॉ. रुपेश कुमार झा जनरल सर्जन पोटातील विकार तज्ञ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल• मालवण तालुक्यातील विविध गावात हरीनाम सप्ताहांना मा.आ. वैभव नाईक यांची उपस्थिती• ओरोसमधील विनयभंग, मारहाण व शिवीगाळ प्रकरणी संशयिताची निर्दोष मुक्तता• देवगड समुद्रात मध्यरात्रीचा थरार: कर्नाटकाची हायस्पीड ट्रॉलर ‘श्री अनघा’ जप्त

कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या विजयाला दोन वर्षे पूर्ण

📅 २४ नोव्हेंबर, २०२६👁 ५ब्रेकिंग
कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या विजयाला दोन वर्षे पूर्ण

*कोंकण एक्सप्रेस

*कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या विजयाला दोन वर्षे पूर्ण

*कार्यकर्त्यांकडून विकासकामांचा उजाळा व विरोधकांवर जोरदार टीका

*कुडाळ / मालवण : प्रतिनिधि

कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या ऐतिहासिक विजयाला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने त्यांच्या समर्थकांकडून व कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर तसेच विविध माध्यमांतून विजयाचा जल्लोष व्यक्त करत गेल्या दोन वर्षांतील कामाचा आढावा आणि विरोधकांवर खरमरीत टीका करण्यात आली आहे.

दोन वर्षांपूर्वी मतदारांनी दिलेला कौल हा केवळ सत्तेचा नसून जनतेचा विश्वास आणि लोककल्याणासाठीचा होता, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या दोन वर्षांत मतदारसंघातील गावागावांत रस्ते, पाणी, वीज आणि शिक्षणासारख्या मूलभूत सुविधांसह विविध विकासकामे मार्गी लावल्याचा दावा समर्थकांकडून करण्यात आला आहे.

नेता केवळ निवडणुकीपुरता मर्यादित न राहता सुख-दुःखाच्या काळात जनतेच्या दारात धावून जातो, तसेच कार्यकर्त्यांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे मान-सन्मान दिला जातो, असेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे. दुसरीकडे, विरोधकांनी केवळ सोशल मीडियावरील पोस्ट आणि अफवा पसरवण्यापलीकडे काहीही केले नसल्याचा आरोप करत त्यांच्यावर जोरदार शरसंधान साधण्यात आले आहे.

आगामी काळातही मतदारसंघातील जनतेचा विश्वास कायम राहील आणि आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली विकास व संघटनेचे काम अधिक जोमाने सुरू राहील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

सिंधुदुर्ग मधील अधिक बातम्या

अधिक पहा →