जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटच्या विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप!

*कोंकण एक्सप्रेस
*जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटच्या विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप!
*फोंडाघाट : संजना हळदिवे
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणप्रवासात हातभार लावण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, पालघर (महाराष्ट्र) यांच्या माध्यमातून फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, फोंडाघाट येथील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या एकूण १,००५ विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रम संस्थेचे चेअरमन मा. श्री. महेश ज. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक मा. श्री. संजय व. आग्रे, मा. श्री. संदेश पां. सावंत, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. प्रसाद कृ. पारकर तसेच जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी श्री. अमर राऊत व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले. शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या वह्यांचे वाटप झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. समाजातील विविध घटकांनी शैक्षणिक कार्यासाठी पुढाकार घेतल्यास विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याला निश्चितच बळ मिळते, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेने राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे शाळा व्यवस्थापन, शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थ्यांकडून कौतुक करण्यात येत आहे.
जाहिरात



