चराटा येथे राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचा स्नेह मेळावा उत्साहात

*कोंकण एक्सप्रेस
*चराटा येथे राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचा स्नेह मेळावा उत्साहात
*सावंतवाडी - प्रतिनिधि
राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र शाखा, कोकण यांच्या वतीने रविवार दि. 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता सावंतवाडीपासून 4 किमी अंतरावर असलेल्या गोवा बॉम्बे हायवे नजीक चराटा गावात स्नेह मेळावा संपन्न झाला.
आंबा, काजू, कोकम, नारळ, सागवान अशा निसर्गरम्य वातावरणातील मसुरकर बंधूंच्या शंभर एकर बागेत हा मेळावा झाला.
यावेळी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा उद्योजक श्री. राजू मसुरकर, परिवहन मंडळाचे निवृत्त लिपिक श्री. श्रीराम वाडकर, सामाजिक कार्यकर्ते श्री. सुनील कोरगावकर, दृष्टिहीन कोकण महासंघाचे अध्यक्ष श्री. शेखर चंद्रकांत आळवे व मोठ्या संख्येने दृष्टिहीन बांधव उपस्थित होते.
राजू मसुरकर यांचे मनोगत
श्री. राजू मसुरकर म्हणाले, "आपण सर्व दृष्टिहीन बांधव माझ्या 100 एकर निसर्गरम्य बागेत आलात, त्याबद्दल मी आपले प्रथम स्वागत करतो.
आपण जरी दृष्टिहीन असलात तरी आपल्या कोणत्याही समस्यांसाठी मी माझ्या मार्फत व उच्चस्तरावरून समस्या दूर करण्याचे आश्वासन देतो. आज माझ्या भूमीत तुमचे पदस्पर्श झाले, याचा मी स्वतःला धन्य समजतो."
संजय गांधी निराधार योजनेची माहिती
यावेळी त्यांनी संजय गांधी निराधार योजनेची सविस्तर माहिती दिली. स्व. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गोरगरीब नागरिकांसाठी ही योजना सुरू केली आहे.
अंध, अपंग, मूकबधिर, कर्णबधिर व्यक्तींसाठी -
- वार्षिक उत्पन्न 50,000 च्या आत
- जिल्हा रुग्णालयाचा 40% अपंगत्वाचा दाखला फोटो, रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुककागदपत्रे तहसील कार्यालयातील सेतू केंद्रात जमा करावीत
- अशा पात्र व्यक्तींना *रु. 2500 मिळतात
. अत्याचारित महिला समलिंगी व्यक्ती अशांना सुद्धा संजय गांधी योजने अंतर्गत आर्थिक मदत 1500 रुपये दर महा शासनाकडून मिळते
इतर निराधार व्यक्ती - विधवा, 65 वर्षांवरील निराधार, 25 वर्षांखालील निराधार मुले, एड्स, टीबी, पॅरालिसिस, अविवाहित 35 वर्षांवरील महिला, कुष्ठरोग, अनाथ, घटस्फोटित, अत्याचारित महिला - यांच्यासाठी तलाठ्याकडील 21 हजार उत्पन्नाचा दाखला असल्यास *रु. 1500 मिळतात.
जिल्हा काँग्रेस सरचिटणीस श्री. राजेंद्र मसुरकर यांनी सांगितले की, काँग्रेसचे सरकार आल्यानंतर ही मदत दुप्पट करण्याचा प्रयत्न करू. तसेच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी अंध, अपंग, मूकबधिरांसाठी शासकीय शाळा व्हावी, यासाठी अधिवेशनात लोकप्रतिनिधींच्या मार्फत प्रश्न लावून धरू. हा प्रश्न सर्व पक्षातील आमदार-खासदारां मंत्री यानी सोडवला पाहिजे.
कारण हा प्रसंग कोणावरही येऊ शकतो. आपल्यावरती किंवा आपल्या कुटुंबातील येऊ शकतो हे ईश्वराने आपल्याला पुण्य काम करण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहेत.
त्याचे भान आपण विसरता कामा नये यानंतर राष्ट्रीय दृष्टीहीन कोकण महासंघाचे अध्यक्ष शेखर चंद्रकांत आळवे त्यांनी आपले मनोगत व्यक्त करून आपल्याला जागा उपलब्ध जिल्हा काँग्रेस जिल्हा सरचिटणीस तथा जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर यांनी दिली.
त्याबद्दल धन्यवाद*दृष्टिहीन बांधवांतर्फे तर्फे मसूरकर यांना देण्यात आले तसे इतर दृष्टीने बांधवांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे
इतर कार्यक्रम
श्री. राम वाडकर यांनी परिवहन महामंडळासंबंधी कोणतीही समस्या असल्यास मदत करण्यास तयार असल्याचे सांगितले
दृष्टिहीन बांधवांसाठी थंड पेय, भेळ, फळे यांचा आस्वाद देण्यात आला. राजू मसुरकर जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांच्याकडून देण्यात आले
श्री. राम वाडकर यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त जिलबी मिठाई वाटप केली, त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले
दुपारी वनभोजन, सायंकाळी दृष्टिहीन बांधवांचा गाण्याचा कार्यक्रम होऊन निरोप समारंभाने मेळाव्याचा समारोप झाला.
जाहिरातसावंतवाडी मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंगसावंतवाडीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख मा.आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाला सत्कार
ब्रेकिंगडॉ. रुपेश कुमार झा जनरल सर्जन पोटातील विकार तज्ञ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल
ब्रेकिंग१४.६५ कोटींच्या सावंतवाडी पंचायत समिती नूतन इमारतीचे थाटात भूमिपूजन
ब्रेकिंग