रविवार, २२ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• फळपिकांच्या संरक्षणासाठी फ्रूट कव्हर वापरण्यास अनुदान• उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा कार्यक्रम• भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी .. मोफत पूर्वप्रशिक्षणाची संधी• १४.६५ कोटींच्या सावंतवाडी पंचायत समिती नूतन इमारतीचे थाटात भूमिपूजन• अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला जामीन मंजूर• दिल्लीत राष्ट्रीय नेमबाजीत फोंडाघाटच्या मनस्या फालेची सुवर्ण कामगिरी• अद्वैत नेवगी हे रिव्हर्स मायग्रेशनचं अतिशय उत्तम उदाहरण -पालकमंत्री नितेश राणे• कोकणातील जल, जंगल, जमिनी वाचविण्यासाठी कायदेशीर मार्गांनी लढा द्या• *हळवल गणपती साना येथे मा.आ. वैभव नाईक,सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत वनराई बंधाऱ्याचा शुभारंभ• “स्थानिक कलागुणांना प्रोत्साहन देत पर्यावरणपूरक सणांची परंपरा जपूया” — भाजप युवा नेते विशाल परब• फळपिकांच्या संरक्षणासाठी फ्रूट कव्हर वापरण्यास अनुदान• उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा कार्यक्रम• भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी .. मोफत पूर्वप्रशिक्षणाची संधी• १४.६५ कोटींच्या सावंतवाडी पंचायत समिती नूतन इमारतीचे थाटात भूमिपूजन• अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला जामीन मंजूर• दिल्लीत राष्ट्रीय नेमबाजीत फोंडाघाटच्या मनस्या फालेची सुवर्ण कामगिरी• अद्वैत नेवगी हे रिव्हर्स मायग्रेशनचं अतिशय उत्तम उदाहरण -पालकमंत्री नितेश राणे• कोकणातील जल, जंगल, जमिनी वाचविण्यासाठी कायदेशीर मार्गांनी लढा द्या• *हळवल गणपती साना येथे मा.आ. वैभव नाईक,सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत वनराई बंधाऱ्याचा शुभारंभ• “स्थानिक कलागुणांना प्रोत्साहन देत पर्यावरणपूरक सणांची परंपरा जपूया” — भाजप युवा नेते विशाल परब

फळपिकांच्या संरक्षणासाठी फ्रूट कव्हर वापरण्यास अनुदान

📅 २२ नोव्हेंबर, २०२६👁 ६ब्रेकिंग
फळपिकांच्या संरक्षणासाठी फ्रूट कव्हर वापरण्यास अनुदान

*कोंकण एक्सप्रेस

*फळपिकांच्या संरक्षणासाठी फ्रूट कव्हर वापरण्यास अनुदान

*एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान २०२६-२७ अंतर्गत शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

*सिंधुदुर्गनगरी

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०२६-२७ अंतर्गत फळपिकांना तसेच फळांच्या घडांना फ्रूट कव्हर (Fruit Cover / Skirting Bag) लावण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे. फळांचे कीड, रोग, पक्षी व सूर्यप्रकाशापासून संरक्षण करून फळांची गुणवत्ता सुधारण्याच्या उद्देशाने हा घटक राबविण्यात येत आहे.

फ्रूट कव्हरच्या वापरामुळे फळांना आकर्षक रंग व चकाकी येण्यास मदत होते. तसेच हानिकारक कीटकनाशके व बुरशीनाशकांचा फळांशी होणारा थेट संपर्क टाळण्यास, फळमाशी व पक्ष्यांपासून संरक्षण करण्यास आणि फळांचे नुकसान कमी करण्यास मदत होते.

या घटकासाठी प्रति हेक्टर ५० हजार रुपये खर्चाचे मापदंड निश्चित करण्यात आले असून, त्याच्या ५० टक्के म्हणजेच प्रति हेक्टर कमाल २५ हजार रुपये अनुदान अनुज्ञेय आहे. लाभासाठी कमाल क्षेत्र मर्यादा २ हेक्टर राहील. अनुसूचित क्षेत्रासाठी खर्चाच्या मापदंडात १५ टक्के अतिरिक्त तरतूद लागू राहील.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्याच्या नावे फळबाग लागवडीखालील क्षेत्राची नोंद सातबारा उताऱ्यावर असणे आवश्यक आहे. वैयक्तिक शेतकरी, शेतकरी समूह, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPC), शासकीय, निमशासकीय, स्वायत्त व अशासकीय संस्था लाभासाठी पात्र राहतील.

लाभासाठी सातबारा उतारा, ८-अ उतारा, आधार कार्ड, आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत तसेच संयुक्त खातेदार असल्यास संमतीपत्र आवश्यक राहील. यासंदर्भातील माहिती ॲग्रीस्टॅक (AgriStack) प्रणालीद्वारेही प्राप्त करण्यात येणार आहे.

फ्रूट कव्हरसाठी IS 16718:2021 या बीआयएस मानकानुसार साहित्य वापरणे आवश्यक आहे. पॉलीप्रोपिलीन नॉन-ओवन फॅब्रिकचे वजन १७ ते २२ GSM असणे आवश्यक आहे. आंबा, संत्रा, पेरू, सीताफळ व ॲव्होकॅडो या फळांसाठी १७ GSM वजनाचे २०० x २०० मिमी आकारमानाचे कव्हर, केळीच्या घडासाठी १७ GSM वजनाचे ८०० x १०२० मिमी आकारमानाचे कव्हर, तर पपईसाठी २२ GSM वजनाचे ३००० x १६०० मिमी आकारमानाचे कव्हर वापरणे आवश्यक आहे. अन्य फळांसाठीही संबंधित फळांच्या प्रकारानुसार बॅगचे आकारमान ग्राह्य धरण्यात येईल. विणलेल्या (Woven) फॅब्रिक साहित्याचा वापर केल्यास त्यासही बीआयएस मानांकन असणे आवश्यक आहे.

या घटकाचा लाभ घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या https://mahadbt.maharashtra.gov.in या महाडीबीटी पोर्टलवर 'फलोत्पादन' या घटकांतर्गत ऑनलाइन अर्ज करावेत.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

सिंधुदुर्ग मधील अधिक बातम्या

अधिक पहा →