कणकवली पंचायत समिती वर्धापन दिन उत्साहात संपन्न

*कोंकण एक्सप्रेस
*कणकवली पंचायत समिती वर्धापन दिन उत्साहात संपन्न
* विशेष सत्कार समारंभाचे आयोजन
*कणकवली: प्रतिनिधि
कणकवली पंचायत समितीच्या वर्धापन दिनानिमित्त विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
या सत्कार समारंभाप्रसंगी कणकवली पंचायत समितीच्या सभापती हर्षदा वाळके, उपसभापती सोनू सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती संतोष साठविलकर, जिल्हा परिषद अध्यक्ष कामत, गटविकास अधिकारी (बीडीओ) अरुण चव्हाण यांच्यासह जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती रंजना काळे तसेच इतर पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ प्रदान करत विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. पंचायत समितीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने झालेल्या या सोहळ्यामध्ये पदाधिकारी, अधिकारी व मान्यवरांनी एकत्र येत वर्धापन दिनाचा आनंद साजरा केला.
जाहिरातकणकवली मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंगनांदगाव येथे २६ व २७ नोव्हेंबरला ५४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन
ब्रेकिंगपालकमंत्री नितेश राणे यांना आमदार म्हणून १२ वर्षे पूर्ण
ब्रेकिंग*कै. सत्यविजय भिसे यांच्या २४ व्या स्मृतिदिनानिमित्त शिवडावमध्ये रक्तदान शिबिर व वारकऱ्यांचा सन्मान

