पुणे जिल्ह्यातील रिंग रोड व घाटरस्त्यांच्या कामाचा सार्वजनिक उपक्रम समितीकडून पाहणी दौरा

*कोंकण एक्सप्रेस
*पुणे जिल्ह्यातील रिंग रोड व घाटरस्त्यांच्या कामाचा सार्वजनिक उपक्रम समितीकडून पाहणी दौरा
*आमदार राहुल कुल व आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती
*पुणे
पुणे जिल्ह्यातील पायाभूत सुविधांना गती देण्याच्या दृष्टीने विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या वतीने आज जिल्ह्यातील विविध घाटरस्ते आणि महत्त्वाकांक्षी रिंग रोड प्रकल्पांच्या प्रगतीचा सविस्तर पाहणी दौरा करण्यात आला. या दौऱ्यादरम्यान कामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
या पाहणी दौऱ्याप्रसंगी सार्वजनिक उपक्रम समितीचे प्रमुख तथा आमदार श्री. राहुल कुल आणि कुडाळ-मालवण विधानसभेचे आमदार श्री. निलेश नारायणराव राणे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासमवेत समितीचे इतर सन्माननीय सदस्य आणि संबंधित शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
समितीच्या सदस्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देऊन रिंग रोड आणि घाटरस्त्यांच्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कामाच्या प्रगतीचे सादरीकरण व सद्यस्थितीची माहिती जाणून घेण्यात आली. प्रकल्पाची कामे विहित वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत, यासाठी अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर चर्चा करून कामाचा वेग वाढवण्याबाबत निर्देश देण्यात आले.
जाहिरात

