मंगळवार, २४ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• नांदगाव येथे २६ व २७ नोव्हेंबरला ५४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन• पुणे जिल्ह्यातील रिंग रोड व घाटरस्त्यांच्या कामाचा सार्वजनिक उपक्रम समितीकडून पाहणी दौरा• कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या विजयाला दोन वर्षे पूर्ण• कणकवली पंचायत समिती वर्धापन दिन उत्साहात संपन्न• वेंगुर्ल्यातील रेडी जंगल परिसरात मिळालेल्या अनोळखी मृतदेहाचे गुढ उकलले• पालकमंत्री नितेश राणे यांना आमदार म्हणून १२ वर्षे पूर्ण• डॉ. रुपेश कुमार झा जनरल सर्जन पोटातील विकार तज्ञ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल• मालवण तालुक्यातील विविध गावात हरीनाम सप्ताहांना मा.आ. वैभव नाईक यांची उपस्थिती• ओरोसमधील विनयभंग, मारहाण व शिवीगाळ प्रकरणी संशयिताची निर्दोष मुक्तता• देवगड समुद्रात मध्यरात्रीचा थरार: कर्नाटकाची हायस्पीड ट्रॉलर ‘श्री अनघा’ जप्त• नांदगाव येथे २६ व २७ नोव्हेंबरला ५४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन• पुणे जिल्ह्यातील रिंग रोड व घाटरस्त्यांच्या कामाचा सार्वजनिक उपक्रम समितीकडून पाहणी दौरा• कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या विजयाला दोन वर्षे पूर्ण• कणकवली पंचायत समिती वर्धापन दिन उत्साहात संपन्न• वेंगुर्ल्यातील रेडी जंगल परिसरात मिळालेल्या अनोळखी मृतदेहाचे गुढ उकलले• पालकमंत्री नितेश राणे यांना आमदार म्हणून १२ वर्षे पूर्ण• डॉ. रुपेश कुमार झा जनरल सर्जन पोटातील विकार तज्ञ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल• मालवण तालुक्यातील विविध गावात हरीनाम सप्ताहांना मा.आ. वैभव नाईक यांची उपस्थिती• ओरोसमधील विनयभंग, मारहाण व शिवीगाळ प्रकरणी संशयिताची निर्दोष मुक्तता• देवगड समुद्रात मध्यरात्रीचा थरार: कर्नाटकाची हायस्पीड ट्रॉलर ‘श्री अनघा’ जप्त

वेंगुर्ल्यातील रेडी जंगल परिसरात मिळालेल्या अनोळखी मृतदेहाचे गुढ उकलले

📅 २४ नोव्हेंबर, २०२६👁 ७ब्रेकिंग
वेंगुर्ल्यातील रेडी जंगल परिसरात मिळालेल्या अनोळखी मृतदेहाचे गुढ उकलले

*कोंकण एक्सप्रेस

*वेंगुर्ल्यातील रेडी जंगल परिसरात मिळालेल्या अनोळखी मृतदेहाचे गुढ उकलले

*दारूच्या त्रासाला कंटाळून मुलानेच केला वडिलांचा खून

*सिंधुदुर्ग / वेंगुर्ला: प्रतिनिधि

वेंगुर्ला तालुक्यातील रेडी येथील जंगलमय भागात संशयास्पद स्थितीत आढळून आलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या खुनाचा गुन्हा अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणला आहे. मद्यधुंद अवस्थेत कुटुंबाला होणाऱ्या सततच्या त्रासाला व मारझोडीला कंटाळून मुलानेच आपल्या लहान भावाच्या मदतीने वडिलांचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

कसा उलगडला खुनाचा गुन्हा?

दिनांक १० नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी इसमाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. याप्रकरणी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मृतदेह अनोळखी असल्याने पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सायबर पोलीस ठाणे आणि वेंगुर्ला पोलीस ठाण्याची स्वतंत्र पथके तयार करून तपास सुरू करण्यात आला.

सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण, रेल्वे विभागाकडून मिळालेली माहिती आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी मयताची ओळख दाऊद मुसाफीर शेख (वय ५६, मूळ रा. वृंदावन टोला, नरदरवा, सितालपूर, पूर्व चम्पारण, राज्य बिहार) अशी पटवली. तपासादरम्यान हा आकस्मित मृत्यू नसून खून असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर २० नोव्हेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२:०८ वाजता वेंगुर्ला पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) आणि २३८ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोंद्यातून आरोपी ताब्यात

मयताच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण व नातेवाईकांच्या चौकशीतून हा गुन्हा मयताचा मुलगा नजरे दाऊद आलम (वय ३१) आणि त्याचा लहान भाऊ (एक विधीसंघर्षग्रस्त बालक, दोघेही मूळ रा. बिहार, सध्या रा. आरोंदा, रेडकरवाडी, ता. सावंतवाडी) यांनी केल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी २० नोव्हेंबर रोजी पहाटे आरोंदा येथून सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.

चौकशीत आरोपींनी वडील दाऊद शेख हे दारू पिऊन कुटुंबाला सतत त्रास देत व मारहाण करत असल्याने त्या त्रासाला कंटाळून दोघांनी संगनमत करून वडिलांचा खून केल्याची आणि पुरावा नष्ट करण्याच्या व मृतदेह लपवण्याच्या उद्देशाने तो रेडी येथील जंगलात नेऊन टाकल्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पथकाचे कौतुक

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, हनुमंत भोसले, सुधीर सावंत तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सायबर पोलीस ठाणे, एटीबी, एसडीपीओ कार्यालय सावंतवाडी आणि सीसीटीएनएसच्या अधिकारी व अंमलदारांनी पार पाडली. त्यांच्या या कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

वेंगुर्ला मधील अधिक बातम्या

अधिक पहा →