डॉ. रुपेश कुमार झा जनरल सर्जन पोटातील विकार तज्ञ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल

*कोंकण एक्सप्रेस
*डॉ. रुपेश कुमार झा जनरल सर्जन पोटातील विकार तज्ञ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल
*नगरसेवक देव्या सूर्याची यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले
*सावंतवाडी - प्रतिनिधि
सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात जनरल सर्जन म्हणून डॉ. रुपेश कुमार झा जनरल सर्जन हे सोमवारी दाखल झाले.
आज रुग्ण कल्याण समितीचे सदस्य व विद्यमान नगरसेवक श्री. देव्या सूर्याची यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. रुपेश कुमार झा यांचे स्वागत केले.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी (हृदयरोग तज्ञ), जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. राजेंद्र (राजू) मसुरकर, माजी सैनिक अधिकारी श्री. दीपक शिर्के, उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिकारी सौ. रूपाली हेळेकर आदी उपस्थित होते.
डॉ. रुपेश कुमार झा यांचा परिचय
डॉ. रुपेश कुमार झा हे मूळचे बिहार राज्याचे असून सध्या पूर्ण कुटुंब मुंबईत राहते.
- एमबीबीएस - जे. जे. रुग्णालय, मुंबई
- पोस्ट ग्रॅज्युएशन (MS) - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई, जि. बीड
- यानंतर लातूर जिल्ह्यात सेवा करून आता सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णसेवेसाठी दाखल झाले आहेत.
विशेष कौशल्य - लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया
डॉ. रुपेश कुमार झा हे पोटातील विकार तज्ञ असून त्यांची स्पेशालिटी लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया आहे. अपेंडिक्स, हर्निया अशा विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया त्या लॅप्रोस्कोपीद्वारे करतात.
लॅप्रोस्कोपी यंत्रसामग्रीचे आश्वासन
यासाठी लवकरच लॅप्रोस्कोपी यंत्रसामग्री सावंतवाडीचे विद्यमान आमदार श्री. दीपक भाई केसरकर यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मार्फत मंजूर करून घेण्याचे आश्वासन रुग्ण कल्याण समितीचे सदस्य श्री. देव्या सूर्याची यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी व जनरल सर्जन डॉ. रुपेश कुमार झा यांना दिले
जाहिरातसावंतवाडी मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंग१४.६५ कोटींच्या सावंतवाडी पंचायत समिती नूतन इमारतीचे थाटात भूमिपूजन
ब्रेकिंगअद्वैत नेवगी हे रिव्हर्स मायग्रेशनचं अतिशय उत्तम उदाहरण -पालकमंत्री नितेश राणे
ब्रेकिंगसावंतवाडीत उद्या नरकासुरांच्या प्रतिकृतींतून कलाविष्काराचा जागर!
ब्रेकिंग