कट्टा-पेंडूर रस्त्यासाठी ग्रामस्थांना रास्ता-रोको आंदोलन करावे लागते याचे आ. निलेश राणेंनी आत्मपरीक्षण करावे- वंदेश ढोलम

*कोंकण एक्सप्रेस
*कट्टा-पेंडूर रस्त्यासाठी ग्रामस्थांना रास्ता-रोको आंदोलन करावे लागते याचे आ. निलेश राणेंनी आत्मपरीक्षण करावे- वंदेश ढोलम
*आमदार होऊन निलेश राणेंना दोन वर्षे झाली तरी रस्ता खड्डेमय का?
*मालवण : प्रतिनिधि
कट्टा-पेंडूर-हुबळीचा माळ-काळसे हा प्रमुख जिल्हामार्ग पूर्णतः खड्डेमय झाला आहे. वाहनचालकांना या मार्गावरून प्रवास करताना कसरत करावी लागत असून अनेक अपघात याठिकाणी घडत आहेत. हा रस्ता सुस्थितीत करण्याची जबाबदारी आमदार निलेश राणेंची असताना आणि ते आमदार होऊन दोन वर्षे झाली तरी त्यांना हा रस्ता सुस्थितीत करता आला नाही. ग्रामस्थांनी वारंवार मागणी करूनही रस्ता सुस्थितीत न झाल्याने नाईलाजाने कट्टा, पेंडूर आणि काळसे येथील ग्रामस्थांना पेंडूर नाका येथे रास्ता-रोको आंदोलन करावे लागले. हे आंदोलन पक्षविरहित असताना देखील सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी आंदोलन कर्त्या ग्रामस्थांची भेट घेण्याचे साधे सौजन्य दाखविले नाही. मात्र ग्रामस्थांनी ताकदीने आंदोलन केल्याने शेवटी प्रशासनाने रस्ता सुस्थितीत करण्याचे आश्वासन दिले. जर रस्ता दुरुस्तीसाठी ग्रामस्थांना रास्तारोको आंदोलन करावे लागत असेल तर आमदार निलेश राणेंनी आपल्या दोन वर्षाच्या कारकिर्दीचे आत्मपरीक्षण करावे असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पेंडूर विभागप्रमुख वंदेश ढोलम यांनी सांगितले आहे.
जाहिरातमालवण मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंगमालवण तालुक्यातील विविध गावात हरीनाम सप्ताहांना मा.आ. वैभव नाईक यांची उपस्थिती
ब्रेकिंगमालवण तालुक्यातील कोळंब- टेंबवाडीचा पाण्याचा प्रश्न अखेर सुटला..!
ब्रेकिंगकांदळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी शिवसेना पक्षात केला जाहीर प्रवेश
ब्रेकिंग