सोमवार, २३ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• ओरोसमधील विनयभंग, मारहाण व शिवीगाळ प्रकरणी संशयिताची निर्दोष मुक्तता• देवगड समुद्रात मध्यरात्रीचा थरार: कर्नाटकाची हायस्पीड ट्रॉलर ‘श्री अनघा’ जप्त• छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी मुंबईत 'स्वराज्याचा सागरध्वज' भव्य सांस्कृतिक सोहळा!• *कै. सत्यविजय भिसे यांच्या २४ व्या स्मृतिदिनानिमित्त शिवडावमध्ये रक्तदान शिबिर व वारकऱ्यांचा सन्मान• ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य!-संदीप साटम यांचे प्रतिपादन• फळपिकांच्या संरक्षणासाठी फ्रूट कव्हर वापरण्यास अनुदान• उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा कार्यक्रम• भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी .. मोफत पूर्वप्रशिक्षणाची संधी• १४.६५ कोटींच्या सावंतवाडी पंचायत समिती नूतन इमारतीचे थाटात भूमिपूजन• अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला जामीन मंजूर• ओरोसमधील विनयभंग, मारहाण व शिवीगाळ प्रकरणी संशयिताची निर्दोष मुक्तता• देवगड समुद्रात मध्यरात्रीचा थरार: कर्नाटकाची हायस्पीड ट्रॉलर ‘श्री अनघा’ जप्त• छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी मुंबईत 'स्वराज्याचा सागरध्वज' भव्य सांस्कृतिक सोहळा!• *कै. सत्यविजय भिसे यांच्या २४ व्या स्मृतिदिनानिमित्त शिवडावमध्ये रक्तदान शिबिर व वारकऱ्यांचा सन्मान• ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य!-संदीप साटम यांचे प्रतिपादन• फळपिकांच्या संरक्षणासाठी फ्रूट कव्हर वापरण्यास अनुदान• उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा कार्यक्रम• भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी .. मोफत पूर्वप्रशिक्षणाची संधी• १४.६५ कोटींच्या सावंतवाडी पंचायत समिती नूतन इमारतीचे थाटात भूमिपूजन• अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला जामीन मंजूर

ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य!-संदीप साटम यांचे प्रतिपादन

📅 २३ नोव्हेंबर, २०२६👁 २ब्रेकिंग
ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य!-संदीप साटम यांचे प्रतिपादन

*कोंकण एक्सप्रेस

*ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य!-संदीप साटम यांचे प्रतिपादन

*चाफेड येथे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

*शिरगांव : संतोष साळसकर

पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात ग्रामीण भागाच्या विकासाला प्राधान्य दिले जात आहे. रस्ते, पाणी आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधा सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी चाफेड येथे केले.

देवगड तालुक्यातील चाफेड मुख्य रस्ता ते श्रीदेव गांगेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ मंगळवारी भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. ग्रामस्थांच्या मागणीनुसार जिल्हा नियोजन समितीमधून या कामासाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणामुळे ग्रामस्थांसह मंदिरात येणाऱ्या भाविकांची मोठी सोय होणार आहे. हे काम प्रत्यक्षात सुरू होत असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

ग्रामीण भागातील प्रत्येक गाव विकासाच्या प्रवाहात आणण्याचा मानस असून, गावागावांतील मूलभूत समस्या सोडविण्यासाठी यापुढेही प्रयत्नशील राहणार असल्याचे संदीप साटम यांनी सांगितले.

यावेळी भाजपचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजेंद्र शेट्ये, मंगेश लोके, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष नार्वेकर, चाफेडचे सरपंच साहिल पांचाळ, ग्रामपंचायत सदस्य सुनील कांडर, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सत्यवान भोगले, विजय परब, प्रकाश मोंडकर, प्रदीप घाडी यांच्यासह गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

देवगड मधील अधिक बातम्या

अधिक पहा →