सोमवार, २३ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• ओरोसमधील विनयभंग, मारहाण व शिवीगाळ प्रकरणी संशयिताची निर्दोष मुक्तता• देवगड समुद्रात मध्यरात्रीचा थरार: कर्नाटकाची हायस्पीड ट्रॉलर ‘श्री अनघा’ जप्त• छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी मुंबईत 'स्वराज्याचा सागरध्वज' भव्य सांस्कृतिक सोहळा!• *कै. सत्यविजय भिसे यांच्या २४ व्या स्मृतिदिनानिमित्त शिवडावमध्ये रक्तदान शिबिर व वारकऱ्यांचा सन्मान• ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य!-संदीप साटम यांचे प्रतिपादन• फळपिकांच्या संरक्षणासाठी फ्रूट कव्हर वापरण्यास अनुदान• उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा कार्यक्रम• भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी .. मोफत पूर्वप्रशिक्षणाची संधी• १४.६५ कोटींच्या सावंतवाडी पंचायत समिती नूतन इमारतीचे थाटात भूमिपूजन• अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला जामीन मंजूर• ओरोसमधील विनयभंग, मारहाण व शिवीगाळ प्रकरणी संशयिताची निर्दोष मुक्तता• देवगड समुद्रात मध्यरात्रीचा थरार: कर्नाटकाची हायस्पीड ट्रॉलर ‘श्री अनघा’ जप्त• छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी मुंबईत 'स्वराज्याचा सागरध्वज' भव्य सांस्कृतिक सोहळा!• *कै. सत्यविजय भिसे यांच्या २४ व्या स्मृतिदिनानिमित्त शिवडावमध्ये रक्तदान शिबिर व वारकऱ्यांचा सन्मान• ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य!-संदीप साटम यांचे प्रतिपादन• फळपिकांच्या संरक्षणासाठी फ्रूट कव्हर वापरण्यास अनुदान• उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा कार्यक्रम• भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी .. मोफत पूर्वप्रशिक्षणाची संधी• १४.६५ कोटींच्या सावंतवाडी पंचायत समिती नूतन इमारतीचे थाटात भूमिपूजन• अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला जामीन मंजूर

छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी मुंबईत 'स्वराज्याचा सागरध्वज' भव्य सांस्कृतिक सोहळा!

📅 २३ नोव्हेंबर, २०२६👁 २ब्रेकिंग
छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी मुंबईत 'स्वराज्याचा सागरध्वज' भव्य सांस्कृतिक सोहळा!

*कोंकण एक्सप्रेस

*छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी मुंबईत 'स्वराज्याचा सागरध्वज' भव्य सांस्कृतिक सोहळा!

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

*सांस्कृतिक कार्यक्रमातून दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना मदतीचा हात

*आमदार प्रमोद जठार आहेत या कार्यक्रमाचे संकल्पनाकार

*मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा, स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाचा आणि मराठी संस्कृतीच्या वैभवाचा जागर घडविणारा 'स्वराज्याचा सागरध्वज' हा भव्य सांस्कृतिक सोहळा बुधवार, दिनांक २५ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पायाभरणी दिनानिमित्त या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना या कार्यक्रमातून मानवंदना अर्पण करण्यात येणार आहे.

सांस्कृतिक सोहळ्यात ऐतिहासिक आणि सांस्कृतिक सादरीकरणासोबतच संहितालेखन, संगीत, गायन, ध्वनी संयोजन, प्रकाशयोजना आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून शिवकालीन इतिहासाचा भव्य आविष्कार सादर केला जाणार आहे. अंबर हडप यांचे संहितालेखन, मंदार खर्डे यांचे निवेदन, कमलेश भडककर यांचे संगीत संयोजन, तसेच केतकी भावे जोशी, स्वरा जोशी, नचिकेत देसाई, जितेंद्र तुपे, विद्या करलगिकर आणि नरेंद्र उमप यांचे गायन या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असणार आहे. या कार्यक्रमाचे संकल्पनाकार आमदार प्रमोद जठार, संयोजक सुहास आदिकरकर, तर विनीत म्हणून सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर काम पाहत आहेत. विशेष म्हणजे, या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना मदतीचा हात देण्याचा सामाजिक उपक्रमही राबविण्यात येणार आहे. त्यामुळे ऐतिहासिक स्मरण, सांस्कृतिक अभिमान आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळणार आहे.

बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात हा सोहळा रंगणार असून, नागरिकांनी सहकुटुंब आणि सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

मुंबई मधील अधिक बातम्या

अधिक पहा →