सोमवार, २३ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• ओरोसमधील विनयभंग, मारहाण व शिवीगाळ प्रकरणी संशयिताची निर्दोष मुक्तता• देवगड समुद्रात मध्यरात्रीचा थरार: कर्नाटकाची हायस्पीड ट्रॉलर ‘श्री अनघा’ जप्त• छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी मुंबईत 'स्वराज्याचा सागरध्वज' भव्य सांस्कृतिक सोहळा!• *कै. सत्यविजय भिसे यांच्या २४ व्या स्मृतिदिनानिमित्त शिवडावमध्ये रक्तदान शिबिर व वारकऱ्यांचा सन्मान• ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य!-संदीप साटम यांचे प्रतिपादन• फळपिकांच्या संरक्षणासाठी फ्रूट कव्हर वापरण्यास अनुदान• उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा कार्यक्रम• भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी .. मोफत पूर्वप्रशिक्षणाची संधी• १४.६५ कोटींच्या सावंतवाडी पंचायत समिती नूतन इमारतीचे थाटात भूमिपूजन• अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला जामीन मंजूर• ओरोसमधील विनयभंग, मारहाण व शिवीगाळ प्रकरणी संशयिताची निर्दोष मुक्तता• देवगड समुद्रात मध्यरात्रीचा थरार: कर्नाटकाची हायस्पीड ट्रॉलर ‘श्री अनघा’ जप्त• छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी मुंबईत 'स्वराज्याचा सागरध्वज' भव्य सांस्कृतिक सोहळा!• *कै. सत्यविजय भिसे यांच्या २४ व्या स्मृतिदिनानिमित्त शिवडावमध्ये रक्तदान शिबिर व वारकऱ्यांचा सन्मान• ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य!-संदीप साटम यांचे प्रतिपादन• फळपिकांच्या संरक्षणासाठी फ्रूट कव्हर वापरण्यास अनुदान• उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा कार्यक्रम• भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी .. मोफत पूर्वप्रशिक्षणाची संधी• १४.६५ कोटींच्या सावंतवाडी पंचायत समिती नूतन इमारतीचे थाटात भूमिपूजन• अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला जामीन मंजूर

पत्रकार विजय गांवकर यांना मातृशोक

📅 २३ नोव्हेंबर, २०२६👁 ७
पत्रकार विजय गांवकर यांना मातृशोक

*कोंकण एक्सप्रेस

*पत्रकार विजय गांवकर यांना मातृशोक

*कणकवली : प्रतिनिधि

सुनिता साबाजी गांवकर, ८६ , नाडकर्णी नगर, कलमठ, कणकवली यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

श्रीम. सुनिता यांनी आपल्या राहत्या घरीच रविवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला, गेले कांही दिवस त्यांचे प्रकृती स्वास्थ नाजूक झाले होते.

सुनिता यांचा जन्म अखंड हिंदुस्थानातल्या (पाकिस्तान मधल्या) कराची येथे झाला होता. फाळणीच्या झळा त्यांनी बालवयातच सोसल्या होत्या. भारत पाकिस्तान फाळणी नंतर भारतात आल्यावर सुरुवातीला कांही काळ बोरिवलीच्या जंगल सदृश्य भागात वास्तव्य केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना उल्हासनगर येथील बॅराक मध्ये हलविण्यात आले होते, आणि त्यानंतर त्यांचं बालपण आणि तरुण पण या ठिकाणीच व्यतीत झाले होते.

लग्नानंतर त्या मुंबई शहरात वास्तव्यास आल्या परंतु त्यांना त्यांच्या मूळ गाव दिगवळेची ओढ जास्त असल्यामुळे त्या पतीबरोबर वरचेवर दिगवळे येथे येत. अखेर त्यांनी नाडकर्णी नगर कलमठ येथे स्वतःचे घर बांधण्याचा आग्रह धरून या ठिकाणी घर बांधले आणि या ठिकाणी राहावयास आल्या.

विविध खाद्यपदार्थ तयार करणे, नवनवीन खाद्यपदार्थ शोधणे आणि ते इतरांना खाऊ घालणे हे त्यांना जास्त पसंत होते.

कणखर व्यक्तिमत्व म्हणून त्या कुटुंबात प्रसिद्ध होत्या. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे , नातसूना, पतवंडे आहेत. वरिष्ठ पत्रकार विजय गांवकर यांच्या त्या मातोश्री होत.

त्यांच्या पार्थिवावर कणकवली येथील स्मशानभूमीत सोमवारी सकाळी नऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कणकवली मधील अधिक बातम्या

अधिक पहा →