मालवणसह १० गावांची ग्रामदेवता असलेल्या नांदरुखच्या गिरोबाचा २६ नोव्हेंबरला जत्रोत्सव

*कोंकण एक्सप्रेस
*मालवणसह १० गावांची ग्रामदेवता असलेल्या नांदरुखच्या गिरोबाचा २६ नोव्हेंबरला जत्रोत्सव
*कणकवली:- प्रतिनिधि
मालवणसह १० गावांची मुळ ग्रामदेवता असलेल्या नांदरुखच्या श्री देव गिरोबाचा वार्षिक जत्रोत्सव येत्या गुरुवार दि. २६ नोव्हेंबरला होणार आहे. हा जत्रोत्सव फटक्यांच्या नयनरम्य आतषबाजीसाठी जिल्हात प्रसिद्ध आहे.
सिंधुदुर्ग किल्ला निर्माण करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी गिरोबाच्या मंदिर परिसरात मजूरांसाठी बाजारपेठ वसविली होती. मंदिराच्या उजवीकडे असलेल्या बारमाही पाण्याच्या तळीमुळे घोड्यांची तहान भागविण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, म्हणून मागच्या बाजूला तलाव खोदलेला आहे.
मुळ नांदरुख गावात मालवण शहरासह देवबाग, तारकर्ली, वायरी, कुंभारमाठ, घुमडे, आनंदव्हाळ, कर्लाचाव्हाळ, कातवण अशा आताच्या १० गावांचा समावेश होता. त्यामुळे या गावांतील भाविक जत्रोत्सवाला उपस्थित राहून दर्शन घेतात. तर देवबाग, तारकर्ली आदी गावांतील मुळ रापणकर संघ आजही नांदरुखच्या साळकुंभा चाळ्याला मासे व्यवसायात भरभराट मिळावी, म्हणून कोंबडे, बकरा भक्ष्य म्हणून मानवतात.
रात्रौ १० वाजण्याच्या दरम्यान श्रीची पालखी वाजतगाजत मंदिरात येते. या दरम्यान अर्धा तास फटाक्यांची नयनरम्य आतषबाजी करण्यात येते. धार्मिक विधीसह माहेरवासिनींच्या ओटी भरण्यात येतात. पालखी प्रदक्षिनानंतर रात्रो वालावलकर दशावतारी नाट्य मंडळाचे दशावतारी नाटक होते. दहीहंडी फोडून जत्रोत्सवाची सांगता होते.
जाहिरातकणकवली मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंगनांदगाव येथे २६ व २७ नोव्हेंबरला ५४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन
ब्रेकिंगकणकवली पंचायत समिती वर्धापन दिन उत्साहात संपन्न
ब्रेकिंगपालकमंत्री नितेश राणे यांना आमदार म्हणून १२ वर्षे पूर्ण
ब्रेकिंग