कणकवली उपजिल्हा रुग्णालयात फळवाटप करून अमित ठाकरे यांचा वाढदिवस साजरा

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात फळवाटप करून अमित ठाकरे यांचा वाढदिवस साजरा

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकवली उपजिल्हा रुग्णालयात फळवाटप करून अमित ठाकरे यांचा वाढदिवस साजरा*

*मनसे विद्यार्थी सेनेचा समाजसेवेचा उपक्रम*

*शिरगांव : संतोष साळसकर*

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष अनिकेत अनंत तर्फे यांच्या प्रमुख उपस्थित कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे रविवारी 24 मे रोजी फळवाटपाचा समाजोपयोगी उपक्रम राबऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी मनसे कणकवली तालुकाध्यक्ष शांताराम सादये यांनी, “समाजसेवेची बांधिलकी जपणाऱ्या नेत्याचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमातून साजरा करणे हीच खरी कार्यकर्त्यांची ओळख आहे,” असे मत व्यक्त केले. तसेच कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.
या प्रसंगी मनसे विद्यार्थी सेना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अनिकेत तर्फे मनसे तालुकाध्यक्ष शांताराम सादये उपतालुकाध्यक्ष अतुल दळवी, मनविसे कणकवली तालुकाध्यक्ष समीर तेली, कणकवली शहराध्यक्ष देवेंद्र जाधव, महाराष्ट्र सैनिक सुनील सोनार यांच्यासह मनसे व मनविसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!