डीप लर्निंगच्या माध्यमातून ‘Sentiment Analysis’ विषयावर संशोधन; सुप्रिया नलावडे यांना पीएच.डी. पदवी

डीप लर्निंगच्या माध्यमातून ‘Sentiment Analysis’ विषयावर संशोधन; सुप्रिया नलावडे यांना पीएच.डी. पदवी

*कोंकण एक्सप्रेस*

*डीप लर्निंगच्या माध्यमातून ‘Sentiment Analysis’ विषयावर संशोधन*

*सुप्रिया समीर नलावडे यांना पीएच.डी. पदवी*

*कोल्हापूर*

संजय घोडावत विद्यापीठ, अतिग्रे येथून इलेक्ट्रॉनिक्स विषयात ‘Sentiment Analysis using Deep Learning’ या अत्याधुनिक विषयावर संशोधन पूर्ण करून सौ. सुप्रिया समीर नलावडे यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली.

सौ. नलावडे यांनी Deep Learning, Convolutional Neural Network (CNN), Natural Language Processing (NLP) आणि Optimization Techniques यांच्या साहाय्याने Sentiment Analysis अधिक अचूक व कार्यक्षम करण्यावर संशोधन केले

विशेष म्हणजे, त्यांच्या ALGO-DeAM संशोधनाला 2026 मध्ये Journal of Systems Science and Systems Engineering मध्ये प्रकाशन मिळाले आहे

या संशोधनासाठी त्यांना मार्गदर्शक प्रा. डॉ. शामला आर. महाडिक यांचे मार्गदर्शन लाभले.

त्यांच्या या शैक्षणिक व संशोधनात्मक यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठातील प्राध्यापक, सहकारी, कुटुंबीय आणि मित्रपरिवारातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!