वेंगुर्ला आगारात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

वेंगुर्ला आगारात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*कोंकण एक्सप्रेस*

*वेंगुर्ला आगारात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*

*वेंगुर्ला प्रतिनिधी –  प्रथमेश गुरव*
एस.टी.कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मिळवलेल्या यशाचा गौरव व्हावा, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी आणि पुढील शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने वेंगुर्ला एस.टी.आगारात दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. भारतीय जनता पार्टी आणि सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघ, वेंगुर्ला आगार यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र ओळखून त्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी योग्य नियोजन करावे आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांनी घेतलेल्या कष्टांची जाणीव ठेवून भविष्यात मोठे यश मिळवावे, असे आवाहन प्रसन्ना देसाई यांनी केले. या कार्यक्रमाला सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघ, वेंगुर्ला आगार अध्यक्ष प्रसन्ना देसाई, वेंगुर्ला आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे, वाहतूक निरीक्षक तारी, सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाचे राज्य उपाध्यक्ष तथा विभागीय सचिव भरत चव्हाण, आगार सचिव दाजी तळवणेकर, वेंगुर्ला आगारातील भाऊ सावळ, चंद्रकांत रजपूत, स्वप्नील रजपूत, महादेव भगत, प्रवीण रेवंडकर, विजय सोनवणे, मार्टीन डिसोझा, आबू सदरकर, निवृत्ती कुर्ले, तेजस जोशी, तांडेल मॅडम, राऊळ, सिद्धी परब, सोपान गवंडे, आशिष खोबरेकर, मिलिंद मयेकर, प्रकाश मोहिते, योगेश बोवलेकर, सुहास घोगळे यांच्यासह अन्य कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!