दापोलीतील जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी “सेवा अभियान संपन्न”

दापोलीतील जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी “सेवा अभियान संपन्न”

*कोंकण एक्सप्रेस*

*दापोलीतील जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी “सेवा अभियान संपन्न”*

*आमदार प्रमोद जठार व संतोष साखरे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून, स्वीकारली निवेदने*

*दापोली : प्रतिनिधी*

भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार मा.श्री. रविंद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सेवा अभियान’ अंतर्गत विविध प्रलंबित प्रश्न व विकासकामांबाबतची निवेदने स्वीकारण्याचा उपक्रम उत्साहात पार पडला.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने दापोली येथे आयोजित सेवा अभियान उत्साहात संपन्न झाले. दापोली येथील भाजपा कार्यालयात आयोजित या अभियानादरम्यान आमदार प्रमोद जठार व श्री. संतोष साखरे यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या विविध समस्या, अडचणी आणि मागण्या जाणून घेतल्या.

या वेळी दापोली तालुक्यातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य, शासकीय योजना, स्थानिक विकासकामे तसेच इतर सार्वजनिक प्रश्नांबाबत आपली निवेदने सादर केली. नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक प्रश्नाची आमदार प्रमोद जठार यांनी आस्थेने दखल घेत संबंधित विषयांवर आवश्यक कार्यवाही करण्याबाबत मार्गदर्शन केले.

जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याची ग्वाही

सेवा अभियानाचा मुख्य उद्देश नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेऊन त्या संबंधित प्रशासनापर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्या निराकरणासाठी पाठपुरावा करणे हा आहे. याच भावनेतून भाजपा कार्यालयात आलेल्या नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेण्यात आल्या.

यावेळी आमदार प्रमोद जठार यांनी नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेत, शक्य त्या प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधण्याचे आश्वासन दिले. तसेच शासनाच्या विविध योजना व विकासकामांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले.

दापोली येथे झालेल्या या सेवा अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी आणि त्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी व पक्ष संघटना जनतेच्या सदैव पाठीशी असल्याचा विश्वास यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला.

यावेळी यावेळी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजपा नेते वैभव खेडेकर, जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, अक्षय फाटक, दापोली तालुका अध्यक्ष जया साळवी, जिल्हा नियेजन समिती सदस्य केदार साठे, पंचायत समिती सदस्य भाऊ इदाते, तालुका अध्यक्ष सचिन होडबे, तालुका सरचिटणीस संदीप केळकर आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!