बुधवार, ३० सप्टेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• नोकरीच्या आमिषाने फसवणूक प्रकरणी विनिता मुंज हिचा अटकपूर्व जामीन फेटाळला• दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीत मंत्री नितेश राणे यांचा समावेश• चाफेड स्वतंत्र पोस्ट कार्यालय आणि तलाठी कार्यालयाचा 1 ऑक्टोंबर रोजी शुभारंभ• नशामुक्तीसाठी जिल्ह्यात व्यापक मोहीम• २ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात जल अर्पण दिवस• जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम• क्रीडा ई-प्रमाणद्वारे ५ टक्के आरक्षणासाठी ..क्रीडा प्रमाणपत्राची ऑनलाइन सुविधा*• *विशेष सखोल पुनरीक्षण (SIR-२०२६)*• सिंधुदुर्गात पर्यटन वाढीसाठीची चळवळ अधिक गतिमान करावी ..... श्री.चंद्रशेखर उपरकर यांचे आवाहन• सर्व मिळून दुष्काळावर मात करूया; बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदतीला प्राधान्य• नोकरीच्या आमिषाने फसवणूक प्रकरणी विनिता मुंज हिचा अटकपूर्व जामीन फेटाळला• दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीत मंत्री नितेश राणे यांचा समावेश• चाफेड स्वतंत्र पोस्ट कार्यालय आणि तलाठी कार्यालयाचा 1 ऑक्टोंबर रोजी शुभारंभ• नशामुक्तीसाठी जिल्ह्यात व्यापक मोहीम• २ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात जल अर्पण दिवस• जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम• क्रीडा ई-प्रमाणद्वारे ५ टक्के आरक्षणासाठी ..क्रीडा प्रमाणपत्राची ऑनलाइन सुविधा*• *विशेष सखोल पुनरीक्षण (SIR-२०२६)*• सिंधुदुर्गात पर्यटन वाढीसाठीची चळवळ अधिक गतिमान करावी ..... श्री.चंद्रशेखर उपरकर यांचे आवाहन• सर्व मिळून दुष्काळावर मात करूया; बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदतीला प्राधान्य

*विशेष सखोल पुनरीक्षण (SIR-२०२६)*

*विशेष सखोल पुनरीक्षण (SIR-२०२६)* *मतदारांसाठी जिल्ह्यात विशेष नोंदणी मोहीम व नव मतदारांसाठी महाविद्यालयीन कॅम्पचे आयोजन*

📅 ३० सप्टेंबर, २०२६👁 ७ब्रेकिंग#sindhudurg
*विशेष सखोल पुनरीक्षण (SIR-२०२६)*

*कोंकण एक्स्प्रेस*

*विशेष सखोल पुनरीक्षण (SIR-२०२६)*

*मतदारांसाठी जिल्ह्यात विशेष नोंदणी मोहीम व नव मतदारांसाठी महाविद्यालयीन कॅम्पचे आयोजन*

*सिंधुदुर्ग*

मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (Special Intensive Revision - SIR 2026) अत्यंत प्रभावीपणे राबविला जात आहे. आयोगाने दिनांक २६ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले असून, त्यानुसार दावे व हरकती सादर करण्यासाठी दिनांक १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तर अंतिम मतदार यादी दिनांक १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. या वाढीव कालावधीत जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांना, महिलांना तसेच नवमतदारांना आपली नावे मतदार यादीत नोंदविण्याची व आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी दिनांक ३, ४, १० व ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सर्व मतदान केंद्रांवर विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली आहे.

दिनांक ०१ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेले अथवा त्या दिवशी १८ वर्षे पूर्ण होत असलेले सर्व युवा नागरिक मतदार नोंदणीसाठी पात्र आहेत. जिल्ह्यातील २६८-कणकवली, २६९-कुडाळ व २७०-सावंतवाडी या तिन्ही विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर शनिवार दि. ०३/१०/२०२६, ०४/१०/२०२६, १०/१०/२०२६, ११/१०/२०२६ या चार दिवशी सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) उपस्थित राहणार आहेत. सदर शिबिरांमध्ये नवीन मतदार नोंदणीसाठी 'नमुना ६', मतदार यादीतील चुकीच्या वा दुबार नोंदी वगळण्यासाठी 'नमुना ७' तसेच नाव, पत्ता दुरुस्ती व छायाचित्र अद्ययावतीकरणासाठी 'नमुना ८' चे अर्ज उपलब्ध राहतील. बीएलओ नागरिकांडून हे अर्ज भरून घेतील. नागरिक Voter Helpline App किंवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://voters.eci.gov.in) घरबसल्या अवघ्या काही मिनिटांत स्वतः ऑनलाइन अर्ज करू शकतात.

तसेच जिल्ह्यातील सर्व पदवी महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, आयटीआय व तंत्रनिकेतनांमध्ये सोमवार दि. ०५ ऑक्टोबर ते शुक्रवार दि. ०९ ऑक्टोबर २०२६ या कार्यालयीन कामकाजाच्या ५ दिवसांत विशेष नोंदणी शिबिरे (Campus Registration Camps) आयोजित केली जाणार आहेत. या शिबिरांमध्ये महाविदयालयांतील इलेक्टोरल लिटरसी क्लब (ELC), राष्ट्रीय सेवा योजना (NSS), एनसीसी (NCC) आणि नियुक्त प्राध्यापक नोडल अधिकारी यांच्या सहकार्याने १८ ते १९ वयोगटातील विद्यार्थ्यांचे 'नमुना ६' ऑनलाइन अथवा ऑफलाइन भरून घेण्यात येतील. सदर विशेष शिबिरांमध्ये सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींनी (BLA) उपस्थित राहून सर्व पात्र नागरिकांची अचूक नोंदणी सुनिश्चित करण्यासाठी सहकार्य करावे.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

सिंधुदुर्ग मधील अधिक बातम्या

अधिक पहा →