बुधवार, ३० सप्टेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• नोकरीच्या आमिषाने फसवणूक प्रकरणी विनिता मुंज हिचा अटकपूर्व जामीन फेटाळला• दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीत मंत्री नितेश राणे यांचा समावेश• चाफेड स्वतंत्र पोस्ट कार्यालय आणि तलाठी कार्यालयाचा 1 ऑक्टोंबर रोजी शुभारंभ• नशामुक्तीसाठी जिल्ह्यात व्यापक मोहीम• २ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात जल अर्पण दिवस• जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम• क्रीडा ई-प्रमाणद्वारे ५ टक्के आरक्षणासाठी ..क्रीडा प्रमाणपत्राची ऑनलाइन सुविधा*• *विशेष सखोल पुनरीक्षण (SIR-२०२६)*• सिंधुदुर्गात पर्यटन वाढीसाठीची चळवळ अधिक गतिमान करावी ..... श्री.चंद्रशेखर उपरकर यांचे आवाहन• सर्व मिळून दुष्काळावर मात करूया; बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदतीला प्राधान्य• नोकरीच्या आमिषाने फसवणूक प्रकरणी विनिता मुंज हिचा अटकपूर्व जामीन फेटाळला• दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीत मंत्री नितेश राणे यांचा समावेश• चाफेड स्वतंत्र पोस्ट कार्यालय आणि तलाठी कार्यालयाचा 1 ऑक्टोंबर रोजी शुभारंभ• नशामुक्तीसाठी जिल्ह्यात व्यापक मोहीम• २ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात जल अर्पण दिवस• जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम• क्रीडा ई-प्रमाणद्वारे ५ टक्के आरक्षणासाठी ..क्रीडा प्रमाणपत्राची ऑनलाइन सुविधा*• *विशेष सखोल पुनरीक्षण (SIR-२०२६)*• सिंधुदुर्गात पर्यटन वाढीसाठीची चळवळ अधिक गतिमान करावी ..... श्री.चंद्रशेखर उपरकर यांचे आवाहन• सर्व मिळून दुष्काळावर मात करूया; बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदतीला प्राधान्य

दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीत मंत्री नितेश राणे यांचा समावेश

📅 ३० सप्टेंबर, २०२६👁 ६ब्रेकिंग#nitesh rane
दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीत मंत्री नितेश राणे यांचा समावेश

*कोंकण एक्स्प्रेस

दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीत मंत्री नितेश राणे यांचा समावेश

अपुरा पाऊस व दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ११ सदस्यीय समिती

मत्स्यव्यवसायाशी संबंधित उपाययोजनांवरही लक्ष

मुंबई

राज्यातील अपुऱ्या पावसामुळे उद्भवलेल्या दुष्काळजन्य परिस्थितीचा वेळोवेळी आढावा घेऊन उपाययोजना सुचविणे आणि परिस्थितीचे संनियंत्रण करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीत मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने २९ सप्टेंबर २०२६ रोजी याबाबत शासन निर्णय जारी केला आहे.

महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या ११ सदस्यीय मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये मंत्री नितेश राणे यांचा समावेश करण्याचा निर्णय २९ सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्देशानुसार घेण्यात आला आहे. यामुळे दुष्काळजन्य परिस्थितीच्या आढाव्यात मत्स्यव्यवसायाशी संबंधित बाबींचाही समावेश होणार आहे.

राज्यात अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा घेणे, आवश्यक उपाययोजना सुचविणे तसेच परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही उपसमिती कार्य करणार आहे. या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री म्हणून मंत्री नितेश राणे यांचा समितीत समावेश महत्त्वाचा ठरला आहे.

मत्स्यव्यवसायाला शेतीचा दर्जा देण्यात आलेला असल्याने दुष्काळी परिस्थितीचा परिणाम होणाऱ्या मच्छिमार आणि मत्स्य उत्पादकांच्या प्रश्नांकडेही या समितीच्या माध्यमातून लक्ष देता येणार आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संबंधित घटकांसाठी आवश्यक मदत व उपाययोजनांबाबतच्या निर्णयप्रक्रियेत मंत्री नितेश राणे यांचा सहभाग राहणार आहे.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

मुंबई मधील अधिक बातम्या

अधिक पहा →