बुधवार, १८ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी• विशालभाई परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!• दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानतर्फे १८ फुटी गणेशमूर्ती उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते अनावरण; तुळशीविवाहापर्यंत दर्शनाची संधी• *कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर• तळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू• भाजपा पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी प्रस्तुत "स्वर दीपावली" मैफिलीचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन• पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्याचे आवाहन• जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक• दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त• किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश• वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी• विशालभाई परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!• दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानतर्फे १८ फुटी गणेशमूर्ती उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते अनावरण; तुळशीविवाहापर्यंत दर्शनाची संधी• *कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर• तळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू• भाजपा पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी प्रस्तुत "स्वर दीपावली" मैफिलीचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन• पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्याचे आवाहन• जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक• दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त• किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

२ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात जल अर्पण दिवस

📅 ३० सप्टेंबर, २०२६👁 १४ब्रेकिंग#सिंधुदुर्ग
२ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात जल अर्पण दिवस

कोंकण एक्स्प्रेस

२ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात जल अर्पण दिवस

पाणीपुरवठा योजनांचे ग्रामसमुदायाकडे औपचारिक हस्तांतरण

सिंधुदुर्ग

: जल जीवन मिशन अंतर्गत गावातील पाणीपुरवठा योजनांचे औपचारिक हस्तांतरण ग्रामसमुदायाकडे करण्याच्या उद्देशाने दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्ह्यात ‘जल अर्पण दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ‘हर घर जल’ घोषित झालेल्या आणि पाणीपुरवठा योजना पूर्ण होऊन सुरळीत पाणीपुरवठा सुरू असलेल्या गावांमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी दिली.

जल अर्पण कार्यक्रमापूर्वी संबंधित ग्रामपंचायतीमध्ये १५ ते २० दिवसांचा ट्रायल रन पूर्ण झाल्याची खात्री करण्यात येणार आहे. या कालावधीत आढळणाऱ्या तांत्रिक त्रुटी तातडीने दूर करण्यात येणार आहेत. तसेच ग्रामपंचायत व ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती (VWSC) यांच्या माध्यमातून ‘ट्रान्सेक्ट वॉक’ करून पाणीपुरवठा योजनेची प्रत्यक्ष पाहणी व तपासणी करण्यात येणार आहे.

पाणीपुरवठा योजनेशी संबंधित नकाशे, मालमत्ता नोंदवही, पाणी गुणवत्ता तपासणी अहवाल, देखभाल व दुरुस्ती (O&M) आराखडा तसेच आवश्यक कागदपत्रे ग्रामपंचायत व VWSC कडे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ग्रामसभेच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना आणि पाणी गुणवत्तेबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.

जल अर्पण दिवसाच्या दिवशी ग्रामसभेत ग्रामस्थांना पाणीपुरवठा योजनेचे हस्तांतरण, योजनेची देखभाल व दुरुस्ती तसेच पाणी गुणवत्तेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात महिला बचत गट, युवक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षक, ग्रामस्थ, भजनी मंडळे आणि लोकप्रतिनिधी यांचा सक्रिय सहभाग घेण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात येणार असून, प्रभात फेरीच्या मार्गावर आकर्षक रांगोळी काढून पाणी व स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

‘जल बंधन’द्वारे गावाची जबाबदारी निश्चित

जल अर्पण कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याच्या टाकीला ‘जल बंधन’ करण्यात येणार आहे. यामधून ‘आजपासून ही पाणीपुरवठा योजना गावाची असून, तिची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी गावाची राहील’, असा संदेश ग्रामस्थांना देण्यात येणार आहे.

गावातील पाणीपुरवठा योजना केवळ शासनाची मालमत्ता न राहता ग्रामसमुदायाच्या सहभागातून तिचे योग्य व्यवस्थापन, देखभाल व संवर्धन व्हावे, हा ‘जल अर्पण’ उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे पात्र गावांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक बाबींची पूर्तता करून दि. २ ऑक्टोबर रोजी ‘जल अर्पण’ कार्यक्रम उत्साहात साजरा करावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी केले आहे.

शेअर करा · Share

सिंधुदुर्ग मधील अधिक बातम्या

अधिक पहा →