बुधवार, १८ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी• विशालभाई परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!• दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानतर्फे १८ फुटी गणेशमूर्ती उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते अनावरण; तुळशीविवाहापर्यंत दर्शनाची संधी• *कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर• तळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू• भाजपा पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी प्रस्तुत "स्वर दीपावली" मैफिलीचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन• पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्याचे आवाहन• जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक• दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त• किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश• वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी• विशालभाई परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!• दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानतर्फे १८ फुटी गणेशमूर्ती उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते अनावरण; तुळशीविवाहापर्यंत दर्शनाची संधी• *कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर• तळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू• भाजपा पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी प्रस्तुत "स्वर दीपावली" मैफिलीचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन• पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्याचे आवाहन• जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक• दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त• किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

नोकरीच्या आमिषाने फसवणूक प्रकरणी विनिता मुंज हिचा अटकपूर्व जामीन फेटाळला

📅 ३० सप्टेंबर, २०२६👁 ४६ब्रेकिंग#kankavali
नोकरीच्या आमिषाने फसवणूक प्रकरणी विनिता मुंज हिचा अटकपूर्व जामीन फेटाळला

*कोंकण एक्स्प्रेस

*नोकरीच्या आमिषाने फसवणूक प्रकरणी विनिता मुंज हिचा अटकपूर्व जामीन फेटाळला

*कणकवली : प्रतिनिधी

केंद्र सरकारमध्ये नोकरी लावते, असे आमिष दाखवून सुमारे १ कोटी २० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी असलेली विनिता विवेक मुंज हिचा अटकपूर्व जामीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. त्रिपाठी यांनी फेटाळून लावला. सरकार पक्षातर्फे अॅड. आर. व्ही. देसाई व फिर्यादी सुनील धुरे यांच्यावतीने अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.

फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तसेच मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवें ऑफ इंडिया येथे नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून पाचजणांकडून प्रत्येकी २४ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा कणकवली पोलीस ठाण्यात दाखल आहे. सुनील दामोदर धुरे (रा. कलमठ गावडेवाडी) यांच्या फिर्यादीनुसार विनिता विवेक मुंज, सुबत्ता माळी, (रा. कणकवली) आणि मनोजकुमार जैन (रा. वाशीम), भागवत यादव, उमेष घोष, जनकराम यादव व निरज श्रीवास्तव यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या गुन्हयातील आरोपी विनिता मुंज हिने अटकपूर्व जामीन मंजूर होण्यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

फिर्यादी घुरे यांची पत्नी आरोग्य खात्यात काम करत असल्याने, तिच्यासोबत काम करणारी विनिता मुंज हिने मुलांना केंद्र सरकारची नोकरी मिळण्याबाबत आपल्याकडे ओळखी आहेत, असे सांगून प्रत्येकी २४ लाख रुपये रोख घेतले होते. फिर्यादीची मुले सिद्धेश व माधुरी घुरे तसेच तन्बी म्हस्के व चैतन्य नाईक निकीता वळवी यांनी प्रत्येकी २४ लाख प्रमाणे १ कोटी २० लाख एवढी रक्कम विनिता मुंजमार्फत सुबत्ता माळीकडे दिली होती.

सुनावणीत एवढ्या मोठ्या रकमेची फसवणूक हा संगनमताने गुन्हा केला असून केंद्र शासनाच्या बनावट दस्तऐवज व सील वापरून ती खरी असल्याचे भासवले आहे, याबाबत तपास वत्ररायचा आहे. तक्रारदार व साक्षीदार यांना दिलेली बनावट सहीची कागदपत्रे आणि बोगस अपॉईंटमेंट लेटर दस्तऐवज कोठे आणि कोणी तयार केले, याचा तपास करायचा आहे. यासह अन्य मुद्दे उपस्थित करत, आरोपी विनिता मुंज हिचा अटकपूर्व जामीन नामंजूर करण्यासाठी युक्तिवाद केला. त्यानुसार न्यायालयाने विनिता मुंज हिचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कणकवली मधील अधिक बातम्या

अधिक पहा →