सिंधुदुर्गात पर्यटन वाढीसाठीची चळवळ अधिक गतिमान करावी ..... श्री.चंद्रशेखर उपरकर यांचे आवाहन

कोंकण एक्सप्रेस
सिंधुदुर्गात पर्यटन वाढीसाठीची चळवळ अधिक गतिमान करावी ..... श्री.चंद्रशेखर उपरकर यांचे आवाहन
कणकवली: संजना हळदिवे
सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये पर्यटन वाढीसाठी प्रचंड वाव असल्यामुळे पर्यटन संस्थानी पर्यटन वाढीसाठीची चळवळ अधिकाधिक गतिमान करावी असे आवाहन "सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास संस्था फेडेरेशनचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर उपरकर यांनी "जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधताना केले आहे.
दिनांक 27 सप्टेंबर हा दिवस जगभरात 1980 पासून "जागतिक पर्यटन दिन " म्हणून ठिकठिकाणी साजरा केला जातो. सन 1970 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थेची (UNWTO)(United Nation World Tourism Organaization )स्थापना झाली. या संस्थेतर्फे दरवर्षी जागतिक पर्यटन दिनासाठी घोषवाक्य (थीम )दिले जाते. त्यानुसार यावर्षी पर्यटन क्षेत्रात(Digital Agenda and Artificial Intelligence to Redesign Tourism) डिजिटल तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून प्रवासाचा अनुभव सुधारणे व पर्यटन व्यवसायाना अधिक कार्यक्षम बनविणे आणि शाश्वत विकास साधणे "यांवर भर देण्यात येणार आहे.
या दिनाचे महत्व ओळखून गेली कांही वर्षे सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास संस्था फेडेरेशन (STDF) तर्फे दि.27 सप्टेंबर दिवशी जागतिक पर्यटन दिनांनिमित्त चर्चा सत्र व सत्कार समारंभ यांचे आयोजन केले जाते.
या पर्यटन दिनाच्या चर्चा सत्राचे उदघाटन सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास संस्था फेडेरेशनचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर उपरकर यांचे शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव श्री. नितीन तळेकर, खजिनदार ऍडव्होकेट श्री. यशवंत आमोणेकर, शिवाई पर्यटन कला एकादमीचे अध्यक्ष श्री. हानीफ पिरखान, श्री. नंदकुमार आरोलकर, श्री. गिरीश उपरकर, श्री. प्रभाकर खटावकर, पर्यटन टूर ऑपरेटर श्री. क्षनिक शंकरदास, वैष्णवी शंकरदास व पर्यटन प्रेमी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकास करताना शाश्वत पर्यटनावर भर दिला पाहिजे. त्यासाठी पर्यटकांच्या आणि स्थानिक समुदा्यांच्या गरजा पूर्ण करताना भविष्यातील नैसर्गिक क्षमतेला कोणताही धोका निर्माण करणे योग्य होणार नाही. त्यासाठी पर्यावरण संरक्षण करणे, नैसर्गिक साधनांचा योग्य वापर करणे, जैवविविधता टिकविणे, प्रदूषण आणि कचरा कमी करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांचबरोबरीने स्थानिक लोकांच्या संस्कृती, परंपरा, मूल्ये यांचा आदर करणे आवश्यक आहे. तसेच स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण करून पर्यटन व्यवसायाचा फायदा हा जास्तीत जास्त स्थानिक लोकांना मिळवून देण्यासाठी सर्वांनी योगदान दिले पाहिजे असे आवाहन श्री. चंद्रशेखर उपरकर यांनी केले आहे.
श्री. यशवंत अमोणेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अजूनही पर्यटन वाढीसाठी बेसिक सुविधा चांगल्या नसल्याची कमतरता बोलून दाखविली.तर नंदकुमार आरोलकर यांनी जिल्ह्याला प्राप्त होणाऱ्या पर्यटन निधीचा वापर योग्यप्रकारे होणे आवश्यक असून जिल्हयातील बँका कडे पर्यटन व्यवसायासाठी कोणतीही योजना नसल्यामुळे बेरोजगारांना पर्यटनात काम करण्याची संधी उपलब्ध होतं नसल्याचे सुतोवाच केले.
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास संस्था फेडेरेशन बरोबर पर्यटन उपक्रमामध्ये काम करण्यासाठी इच्छुक असलेल्याना सहभागी करून पुढील धोरण ठरविण्यासाठी लवकरच स्वतंत्र बैठकीचे आयोजन करण्यात येईल असे संस्थेचे सचिव श्री. नितीन तळेकर यांनी सांगितले.
जाहिरातकणकवली मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
गोपुरीत ४ आॅक्टोबरला वक्तृत्व स्पर्धा

पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी कै. दत्तात्रय फोपे यांना करूळ येथे शोकसभेत वाहिली श्रद्धांजली
ब्रेकिंगपाण्याचे सुयोग्य नियोजन करण्याची सवय आत्मसात करूया – पालकमंत्री नितेश राणे
ब्रेकिंग