शनिवार, २८ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• पत्रकारांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य अधिकाऱ्याला भोवले!• निधी पुन्हा मिळाला नाही तर जि.प. वर भजनी कलाकारांचा भव्य मोर्चा काढण्याचा दिला इशारा• कलमठ ग्रामपंचायत मार्फत संविधान दिन साजरा.• सावंतवाडीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख मा.आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाला सत्कार• शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा आज माणगाव खोऱ्यात झंजावती दौरा.!• ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना - २०२६’ मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा• जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटच्या विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप!• ‘स्वराज्याचा सागरध्वज’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद• चराटा येथे राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचा स्नेह मेळावा उत्साहात• नरडवे प्रकल्पाची घळभरणी लवकरच होणार!• पत्रकारांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य अधिकाऱ्याला भोवले!• निधी पुन्हा मिळाला नाही तर जि.प. वर भजनी कलाकारांचा भव्य मोर्चा काढण्याचा दिला इशारा• कलमठ ग्रामपंचायत मार्फत संविधान दिन साजरा.• सावंतवाडीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख मा.आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाला सत्कार• शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा आज माणगाव खोऱ्यात झंजावती दौरा.!• ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना - २०२६’ मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा• जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटच्या विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप!• ‘स्वराज्याचा सागरध्वज’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद• चराटा येथे राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचा स्नेह मेळावा उत्साहात• नरडवे प्रकल्पाची घळभरणी लवकरच होणार!

फोंडाघाट महाविद्यालयाचा मुंबई विद्यापीठ अंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत यश

📅 २७ नोव्हेंबर, २०२६👁 १२
फोंडाघाट महाविद्यालयाचा मुंबई विद्यापीठ अंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत यश

*कोंकण एक्सप्रेस*

*फोंडाघाट महाविद्यालयाचा मुंबई विद्यापीठ अंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत यश*

*शहापूर (ठाणे) :*

मुंबई विद्यापीठाच्या अंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा नुकत्याच एस. बी. कॉलेज, शहापूर, जिल्हा ठाणे येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, फोंडाघाट या महाविद्यालयाने उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या अंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा गजानन पांडुरंग पाटील महाविद्यालय, कोनगाव, ता. भिवंडी, जि. ठाणे येथे सुरू असून या स्पर्धेत फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचलित कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट येथील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

या स्पर्धेत फोंडाघाट महाविद्यालयातील श्रेयश विजय गिरी (एस.वाय.बी.ए.) याने ८२ किलो वजन गटात तर आदित्य धनाजी फराकटे (एफ.वाय.बी.ए.) याने ७२ किलो वजन गटात ब्रांझ मेडल पटकविले.

आदित्य अनिल गिरीगोसावी (एस.वाय.बी.ए) याची ७७ किलो वजन गटात सिल्व्हर मेडल पटकविले.

विजेत्या खेळाडूंना महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. बालाजी सुरवसे तसेच कुस्ती प्रशिक्षक सागर पाटील प्राचार्य डॉ पुरंधर नारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश सावंत, सेक्रेटरी चंद्रशेखर लिंग्रस, खजिनदार विठोबा तायशेटे तसेच संचालक मंडळ व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांनी दोन्ही विजेत्या खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व फोंडाघाट ग्रामस्थांनी या यशाबद्दल अभिमान व्यक्त करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कणकवली मधील अधिक बातम्या

अधिक पहा →