शनिवार, २८ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• पत्रकारांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य अधिकाऱ्याला भोवले!• निधी पुन्हा मिळाला नाही तर जि.प. वर भजनी कलाकारांचा भव्य मोर्चा काढण्याचा दिला इशारा• कलमठ ग्रामपंचायत मार्फत संविधान दिन साजरा.• सावंतवाडीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख मा.आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाला सत्कार• शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा आज माणगाव खोऱ्यात झंजावती दौरा.!• ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना - २०२६’ मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा• जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटच्या विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप!• ‘स्वराज्याचा सागरध्वज’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद• चराटा येथे राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचा स्नेह मेळावा उत्साहात• नरडवे प्रकल्पाची घळभरणी लवकरच होणार!• पत्रकारांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य अधिकाऱ्याला भोवले!• निधी पुन्हा मिळाला नाही तर जि.प. वर भजनी कलाकारांचा भव्य मोर्चा काढण्याचा दिला इशारा• कलमठ ग्रामपंचायत मार्फत संविधान दिन साजरा.• सावंतवाडीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख मा.आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाला सत्कार• शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा आज माणगाव खोऱ्यात झंजावती दौरा.!• ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना - २०२६’ मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा• जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटच्या विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप!• ‘स्वराज्याचा सागरध्वज’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद• चराटा येथे राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचा स्नेह मेळावा उत्साहात• नरडवे प्रकल्पाची घळभरणी लवकरच होणार!

पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या माध्यमातून विकास कामाचा झंझावात

कुवळे परबवाडी येथे पायवाट बांधकामाचे भूमिपूजन जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न!*

📅 २७ नोव्हेंबर, २०२६👁 ५
पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या माध्यमातून विकास कामाचा झंझावात

*कोंकण एक्सप्रेस*

*पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या माध्यमातून विकास कामाचा झंझावात*

*कुवळे परबवाडी येथे पायवाट बांधकामाचे भूमिपूजन जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न!*

*शिरगांव / संतोष साळसकर*

डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत देवगड तालुक्यातील कुवळे - परबवाडी येथील पायवाट बांधणे (रक्कम रुपये 5लक्ष )या कामाचे भूमिपूजन भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीपजी साटम यांच्या प्रमुख उपस्थितीत, कुवळे गावचे सरपंच सुभाष कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष नार्वेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजेंद्र शेट्ये, मंगेश लोके, उपसरपंच सुहास राणे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष थोरबोले, रत्नदीप कुवळेकर, उर्मिला परब, बूथ अध्यक्ष अजित घाडी, माजी सरपंच महेंद्र परब, ग्रामस्थ विश्वनाथ परब आदी मान्यवर व परबवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर काम पालकमंत्री नितेश राणे यांच्या शिफारशीनुसार मंजूर झाले असून, या पायवाटेच्या कामामुळे परबवाडीतील ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर होणार आहे. विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही जनतेने पक्षावरील विश्वास अधिक दृढ करावा असे प्रतिपादन जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी केले. या विकासकामामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून, हे काम मंजूर करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

देवगड मधील अधिक बातम्या

अधिक पहा →