*कोंकण एक्सप्रेस*
*अँड. यश दीपक अंधारी याचे सीएस परीक्षेत उत्तुंग यश*
*कणकवली : संजना हळदिवे*
कणकवली येथील अँड.दीपक व सौं.दिशा अंधारी यांचे सुपुत्र यश अंधारी यांने आय सी एस आय या राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या सीएस अर्थात कंपनी सेक्रेटरी परीक्षेत उत्तुंग यश संपादन केल्याने त्याचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे
अँड.यश यांने बीबीए- एलएलबी ही पदवी मुंबई विद्यापीठातील कॉलेजमधून कॉर्पोरेट लॉ मध्ये संपादन केली.त्यानंतर पुणे येथील आय.एल. एस. या प्रख्यात महाविद्यालयातून एल. एल. एम. ही पदवी संपादन केली.त्याच वेळी इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया इन कॉर्पोरेट लॉ अँड फायनान्स मार्फत घेतल्या जाणाऱ्या सी एस च्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला.त्याच्या अत्यंत काठीण्य पातळीवरील परीक्षेत अँड.यश याने उत्तुंग यश संपादन केल्याने सिंधुदुर्ग जिल्हा वकील वर्गातून तसेच कणकवली तालुका वकील संघटना यांचे कडून त्याचे व पालकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

