कुडासे-वानोशी नदीत बुडून १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू…

कुडासे-वानोशी नदीत बुडून १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू…

*कोंकण एक्सप्रेस*

*कुडासे-वानोशी नदीत बुडून १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू…*

*दोडामार्ग: शुभम गवस*

तालुक्यातील कुडासे-वानोशी नदी परिसरात आज सायंकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत वेदांत सचिन सांगेलकर (वय १३) या अल्पवयीन मुलाचा नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वेदांत हा मूळ मुंबई येथील रहिवासी असून सध्या तो आपल्या आजीसोबत दोडामार्ग येथे राहत होता. उन्हाळी सुट्टी निमित्त तो गावी आला होता. दरम्यान, आपल्या भावासोबत तो कुडासे-वानोशी नदीवर अंघोळीसाठी गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात गेला आणि बुडाला.
घटनेनंतर त्याच्या बचावासाठी स्थानिक ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले. माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. काही वेळानंतर वेदांतला पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याला तातडीने साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी तपासणी करून त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून सांगेलकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!