कळणे सीमा परिसरातील खड्डे बुजवले; वाहनचालकांना दिलासा…

कळणे सीमा परिसरातील खड्डे बुजवले; वाहनचालकांना दिलासा…

*कोंकण एक्सप्रेस*

*कळणे सीमा परिसरातील खड्डे बुजवले; वाहनचालकांना दिलासा…*

*दोडामार्ग : शुभम गवस*

दोडामार्ग–बांदा मुख्य रस्त्यावरील कळणे सीमा परिसरात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. वारंवार अपघाताचा धोका निर्माण होत असल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने या समस्येची दखल घेत संबंधित ठिकाणचे खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण केले आहे.
या समस्येकडे भाजप तालुका सरचिटणीस अंकुश ऊर्फ भैया नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधून तातडीने दुरुस्तीची मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्यानंतर विभागाने त्वरित कार्यवाही करत रस्त्याची दुरुस्ती केली.
रस्त्यावरील खड्डे बुजवल्यामुळे वाहनचालक व स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या कामामुळे वाहतुकीस मोठा दिलासा मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. यावेळी सासोली सरपंच बळिराम शेटये तसेच कळणे सरपंच अजित देसाई उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!