*कोंकण एक्सप्रेस*
*कुडाळ येथे ८ व ९ जून रोजी ‘स्पेस सायन्स ॲन्ड टेक प्रो – २०२६’ या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन*
*कुडाळ : प्रतिनिधि*
विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ विज्ञानाबद्दल जिज्ञासा, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने नेशनल सेंटर फॉर सायन्स कम्युनिकेटर्स, मुंबई, इंडो सायन्स एज्युकेशन ट्रस्ट, पुणे, इस्रो स्पेस टेक्नॉलॉजी सेल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि संत रावूळ महाराज महाविद्यालय, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्पेस सायन्स अॅन्ड टेक प्रो – २०२६’ या विशेष कार्यशाळेचे आयोजन दि. ८ व ९ जून २०२६ रोजी महाविद्यालयात करण्यात आले आहे.
ही कार्यशाळा इयत्ता ९ वी, १० वी, ११ वी तसेच १२ वी (विज्ञान शाखा) मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना स्पेस सायन्स आणि तंत्रज्ञानाची मूलभूत माहिती थिअरी व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून दिली जाणार आहे.
कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना सॅटेलाईट ऑर्बिट आणि स्पेस सायन्स, वॉटर रॉकेट लाँचिंग, पॅराशूट मॉडेल तयार करणे, वॉटर फिल्टर मॉडेल विकसित करणे अशा विविध उपक्रमांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेण्याची संधी मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक विचारशक्ती, सर्जनशीलता आणि नवकल्पनांना चालना मिळणार आहे.
या कार्यशाळेसाठी प्रवेश शुल्क ₹२०००/- (कार्यशाळा साहित्यांसह) निश्चित करण्यात आले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन आपली नोंदणी करावी.
नोंदणी लिंक :
http://ln.run/3tHDd
तसेच दि. १० जून रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून ‘करिअर गाईडन्स’ सत्राचे आयोजन करण्यात आले असून विविध विषयांतील करिअरच्या संधींबाबत तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
प्रा. अभिषेक चव्हाण
📞 ९८२२०००६५६ / ९४२०११३०५९
“अंतराळ विज्ञानाच्या विश्वात प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची सुवर्णसंधी – विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,” असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

