*कोंकण एक्सप्रेस*
*सिंधुदुर्ग किल्ल्यातील श्री शिवराजेश्वर मंदिरासाठी ऐतिहासिक निर्णय!*
*राज्य शासनाकडून ₹१ लाख वार्षिक अनुदान मंजूर*
*मालवण : प्रतिनिधि*
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यातील श्री शिवराजेश्वर मंदिराच्या दिवाबत्ती, पुजारी व सेवेकऱ्यांच्या मानधनासाठी तब्बल ५५ वर्षांनंतर मोठी वाढ करण्यात आली आहे.
🔸 १९७० पासून मिळणारे फक्त ₹३,००० वार्षिक अनुदान
➡️ आता राज्य शासनाकडून ₹१ लाख वार्षिक अनुदान मंजूर
ही ऐतिहासिक वाढ मिळवण्यासाठी आमदार मा. निलेश राणे साहेब तसेच श्री शिवराजेश्वर देवस्थान न्यास यांनी सातत्याने शासनाकडे प्रभावी पाठपुरावा केला.
याबाबत महाराष्ट्र शासनाने तात्काळ निर्णय घेत शासन आदेश जारी केला असून यासाठी
✨ मा. मुख्यमंत्री सन्माननीय श्री. देवेंद्र फडणवीस साहेब
✨ मा. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते सन्माननीय श्री. एकनाथ शिंदे साहेब
✨ मा. उपमुख्यमंत्री सन्माननीय सुनेत्रा पवार वाहिनी
✨ मा. महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेब
✨ मा. मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री सन्माननीय श्री. नितेश राणे साहेब
यांचे विशेष आभार….🙏
छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकमेव ऐतिहासिक मंदिराच्या संवर्धनासाठी घेतलेला हा निर्णय सिंधुदुर्गच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल

