समाज उन्नतीसाठी समाजातील प्रत्येक घटक महत्त्वाचा – घनश्याम गांवकर

समाज उन्नतीसाठी समाजातील प्रत्येक घटक महत्त्वाचा – घनश्याम गांवकर

*कोंकण एक्सप्रेस*

*समाज उन्नतीसाठी समाजातील प्रत्येक घटक महत्त्वाचा – घनश्याम गांवकर*

*कणकवली ः संजना हळदिवे*

समाज हा विविध घटकांपासून बनलेला असतो आणि समाजाच्या उन्नतीसाठी समाजातील प्रत्येक घटक महत्त्वाचा असतो, असे प्रतिपादन क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज,मुंबई या संस्थेचे अध्यक्ष घनश्याम गांवकर यांनी केले. गांवकर कुडाळ येथे आयोजित क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाजाच्या विभागीय स्नेह मेळाव्यात बोलत होते.

प्रत्येक समाजात डॉक्टर, वकील, इंजिनियर ,शिक्षक यांच्याप्रमाणेच शेतकरी, कामगार असे अनेक घटक असतात. पण प्रत्येकाने समाजाप्रती आपलं कर्तव्य आहे या जाणिवेतून काम करायला हवे तरच समाज उन्नतीकडे वळेल. असे ते पुढे म्हणाले. क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाजाच्या वागदे, कणकवली येथील नियोजित समाज भवनासाठी घाडीगांवकर समाजातील प्रत्येकाने आपला सक्रिय सहभाग दर्शवायला हवा,असे आवाहन घनश्याम गांवकर यांनी स्नेह मेळाव्यामध्ये केले.

या मेळाव्यामध्ये घाडीगांवकर समाजातील स्पर्धा परीक्षांमधील यशस्वीतांचे, यशस्वी उद्योजक, शिक्षक, राजकीय क्षेत्रातील व्यक्ती आदी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी १०१ वर्ष पूर्ण झालेल्या क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज, मुंबई या संस्थेविषयी तसेच त्याच्या कार्याविषयी माहिती पत्रकार विजय गांवकर यांनी दिली. तर वागदे येथील नियोजित घाडीगांवकर समाज भवन उभारणी कार्याविषयी माहिती समाज संस्थेचे अध्यक्ष घनश्याम गांवकर यांनी दिली. कार्यक्रमाला मंचावर घनश्याम गांवकर ,लक्ष्मण घाडीगांवकर , सूर्यकांत घाडी, मधुकर घाडी, डॉ. जे के घाडी, गणेश घाडी अनंत गांवकर , प्रणाली घाडी, श्वेता घाडी, सुनील घाडी

आदी मान्यवर उपस्थित होते. या स्नेह मेळाव्याला मुंबईहून अंधेरी विभागाचे अध्यक्ष विजय घाडीगांवकर,डोंबिवली विभागाचे अध्यक्ष आर के घाडीगांवकर,भांडुप येथुन सुनिल घाडीगांवकर तसेच अंनत घाडी आणि दिनकर घाडी हे माजी अध्यक्षही उपस्थित होते. याशिवाय सहदेव घाडी, आप्पा घाडी , सदानंद घाडीगांवकर, प्रदीप घाडी, बुधाजी घाडीगांवकर, सुनील गांवकर,दत्तगुरु गांवकर, सत्यवान घाडीगांवकर , शामसुंदर घाडी, जगन्नाथ गांवकर, स्नेहा घाडी, रमेश गांवकर, कैलास घाडीगांवकर, विवेक कळसुलकर, डॉ. आकाश घाडी तसेच कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ले तालुक्यातील घाडीगांवकर समाज बंधुभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन विजय गांवकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन बुधाजी घाडीगांवकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!