*कोंकण एक्सप्रेस*
*हत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी काँग्रेसचे तालुका प्रमुख बाबू गवस सरसावले..*
*दोडामार्ग : प्रतिनिधि*
पाळये परिसरात हत्तीच्या हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेती आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर दोडामार्ग काँग्रेसचे तालुका प्रमुख बाबू गवस यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच प्रशासनाने तत्काळ पंचनामा करून मदतीची प्रक्रिया वेगाने राबवावी, अशी मागणी केली. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

