*कोंकण एक्सप्रेस*
*कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचा ७३वा वर्धापनदिन सोहळा उद्या*
*कणकवली : प्रतिनिधि*
कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि काॅलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि काॅलेज ऑफ सायन्स आणि बालमंदिर कनेडी या प्रशालेचा ७३ वा वर्धापनदिन सोहळा उद्या रविवार दि. १२ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता प्रशालेच्या ज्ञानदीप सांस्कृतिक भवन येथे साजरा केला जाणार आहे. सदर कार्यक्रमामध्ये विद्यार्थी सत्कार सोहळा व प्रतिथयश मान्यवरांचा सत्कार समारंभ सुद्धा करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमाला सन्मा. प्रा. डॉ. प्रदीप ढवळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमाचे कार्यक्रमाध्यक्ष क. ग. शि. प्र. मंडळ, मुंबईचे अध्यक्ष सन्मा. श्री. सतीश सावंत भूषविणार आहेत. सदर कार्यक्रमाला संस्था व शालेय समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला आजी – माजी विद्यार्थी, ग्रामस्थ व प्रशालेचे हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संख्येचे सरचिटणीस सन्मा. श्री. शिवाजी सावंत यांनी केले आहे.

