विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत परराज्यातून प्रवेश घेतलेल्या अमराठीभाषिक विद्यार्थ्यांना मातृभाषा मराठीचे प्रशिक्षण

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत परराज्यातून प्रवेश घेतलेल्या अमराठीभाषिक विद्यार्थ्यांना मातृभाषा मराठीचे प्रशिक्षण

*कोंकण एक्सप्रेस*

*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत परराज्यातून प्रवेश घेतलेल्या अमराठीभाषिक विद्यार्थ्यांना मातृभाषा मराठीचे प्रशिक्षण*

*कणकवली : संजना हळदिवे*

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत परराज्यातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना माय मराठी भाषेचे प्रगत ज्ञान विविध राज्यातून प्रशालेत आलेल्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा मुळाक्षरापासून ते बाराखडी वाक्यांची रचना तसेच वाचन लेखन सराव प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले . परराज्यातून आलेले विद्यार्थी कर्नाटक , गुजरात , बिहार , उत्तरप्रदेश ‘गोवा , पंजाब ,राजस्थान या राज्यातील विद्यार्थ्यांच्या मातृभाषेतून शिक्षण घेऊन महाराष्ट्र राज्यात शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेले आहेत त्यामुळे मराठी माध्यमातून शिक्षण घेतांना परराज्यातील विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होत असतात म्हणून मराठी माध्यमाच्या शिक्षण प्रवाहात एकरूप होऊन सहज शिक्षण घेता यावे या उद्देशाने प्रशालेत अमराठी भाषिक विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केलेले आहे परराज्यातून आलेले ९० विद्यार्थी मराठी मातृभाषेचे शिक्षण मोठ्या आवडीने व आनंददायिक वृत्तीने मराठी मातृभाषेचे धडे गिरवत आहेत . या प्रशिक्षण वर्गाला मार्गदर्शन करतांना मुख्याध्यापक श्री पी. जे. कांबळे सरांनी मातृभाषा मराठीचे शिक्षणातील महत्व विषद केले तसेच अमराठी भाषिक मार्गदर्शन वर्गाचे प्रमुख श्री बुधाजी दरवडा सरांनी उत्तम नियोजन करून . विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग दाखविला या अमराठी भाषिक वर्गांचे मराठी विषयाचे शिक्षक सौ पी . पी सावंत मॅडम श्री संदिप कदम सर सौ विद्या शिरसाट मॅडम यांनी मार्गदर्शन करून अमराठी भाषिक विद्यार्थ्यांना मातृ भाषेची अभिरुची निर्माण केली या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!