संविधानसभेवर डॉ. आंबेडकरांना घेण्यास कॉग्रेसच्या हायकमांडचा विरोध होता

संविधानसभेवर डॉ. आंबेडकरांना घेण्यास कॉग्रेसच्या हायकमांडचा विरोध होता

*कोंकण एक्सप्रेस*

*संविधानसभेवर डॉ. आंबेडकरांना घेण्यास कॉग्रेसच्या हायकमांडचा विरोध होता*

*अ‍ॅड. संदीप जाधव यांचे मत : जानवलीत डॉ. आंबेडकरांना अपेक्षित असलेला बौद्ध धम्म, बौद्ध अनुयानी विषयावर व्याख्यान*

*कणकवली ः संजना हळदिवे*

संविधान सभेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे निवडून येऊ नये म्हणून कॉंग्रेसच्या हायकंमाडने मुंबई प्रांताचे पंतप्रधान बाळासाहेब खेर यांच्यामदतीने उत्तर मुंबईतून डॉ. आंबेडकर यांना पाडण्याचे काम केले. संविधानसभेवर डॉ. आंबेडकर हे निवडून गेले पाहिजेत, यासाठी पश्चिम बंगालमधील शेडुल कास्टचे प्रतिनिधीत्व करणाºया जोगेश्वर थमंड यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन स्वत:च्या मतदारसंघातून डॉ. आंबेडकर यांना निवडून आले. संविधानसभेवर डॉ. आंबेडकर हे निवडून गेल्यानंतर त्यांनी १४१ दिवसांमध्ये संविधानाचा ड्राफ्ट तयार केला. त्यांनी हा डॉफ्ट २६ नोव्हेंबर ११४९ रोजी संविधान सभेला समर्पित केला. देशातील मतदारसंघांमधील काही मतदारसंघ हे दलितांसाठी राखीव असले पाहिजे, असे डॉ. आंबेडकर यांचे मत होते. त्यानुसार डॉ. आंबेडकर हे संविधानात तरतूद करणार होते. हे जेव्हा महात्मा गांधी यांना येरवडयाच्या जेलमध्ये शिक्षा भोगत असताना कळले तेव्हा त्यांनी यानिर्णयाविरोधात जेलमध्ये उपोषण केले. त्यांच्या उपोषणामुळे दलितांचा हिंसक झळ बसू शक्यते हे डॉ. आंबेडकरांना लक्षात आल्यानंतर त्यांनी एक पाऊल मागे घेत ती तरतूद टाळली. डॉ. आंबेडकरांनी आपल्या आयुष्यात असंविधानिक, हिंसक मार्गाचा अवलंब न करताना संविधानिक, अहिंसक मार्गाने अन्ययाविरोधात लढा दिला, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे वकील तथा तथागत डॉ. आंबेडकर विचार संघाचे अध्यक्ष संदीप जाधव यांनी व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथील नीलम कंट्रीसाईटच्या सभागृहात डॉ. आंबेडकरांना अपेक्षित असलेला बौद्ध धम्म, बौद्ध अनुयायी या विषयावर विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानात अ‍ॅड. जाधव बोलत होते. यावेळी जि. प. च्या समाज कल्याण सभापती रुहिता तांबे, कणकवली पंचायत समितीचे उपसभापती राजेश उर्फ सोनू सावंत, भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री,माजी नगरसेवक गौतम खुडकर, ज्येष्ठ पत्रकार गणेश जेठे आदी मान्यवर उपस्थित होते.

अ‍ॅड. जाधव म्हणाले, २००० ते ३००० वर्षांपासून देशात वर्ण व्यवस्था अस्तित्वात होती. या व्यवस्थेची सर्वात जास्त झळ दलित, वंचितांना सोवावी लागली. डॉ. आंबेडकर यांना बडोदा संस्थानमध्ये शिक्षण घेत असताना अपृश्यतेची झळ सोसावी. त्यामुळे त्यांनी अपृश्यतेच्याविरोधात लढा दिला. देशात समानता, बंधुता असली पाहिजे, या मताचे डॉ. आंबेडकर होते. देशातील राजकीय व सामाजिक व्यवस्थेत बदल होण्यासाठी डॉ. आंबेडकर यांनी संघर्षमय लढा दिला. डॉ. आंबेडकरांनी महाडाच्या चवदार तळ्याचा, नाशिकमधील काळाराम मंदिराचा लाढा संविधानिक, असंहिस मार्गाचा अवलंब करीत हा लढा जिंकला होता. अपृश्यता व विषमतेबद्दल डॉ. आंबेडकरांच्या मनात तीव्र चिड होती. अपृश्यता व विषमता नष्ट करण्यासाठी त्यांनी जगातील बहुतांशी देशांच्या संविधानांचा अभ्यास केला होता. डॉ. आंबेडकरांनी आपण हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, अशी घोषणा केली. त्यानुसार त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारून दलित, वंचित यांचे आयुष्यात बदल घडून आणून त्यांना समानतेची संधी दिली, असे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन डॅ. मिलिंद कुलकर्णी यांनी केले.यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध समाज बांधवसह बुद्धिवंत नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!