सामान्य नागरिक गॅस वर

सामान्य नागरिक गॅस वर

*कोंकण एक्स्प्रेस*

*सामान्य नागरिक गॅस वर*

*सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी मांडली वस्तूस्थिती*

*कणकवली : प्रतिनिधी*

सामान्य नागरिक आज गॅस वेळेवर मिळत नसल्याने हैराण झालेला असून, बुकिंग करून सुध्दा सिलिंडर घरपोच कधी मिळेल याची शाश्वती नाही,

घरपोच मिळण्याचे पैसे देऊन सुध्दा गॅस कार्यालयात तासनतास लाइन मध्ये ऊभे राहून सिलिंडर वाहनासाठी जादा पैसे खर्च करून घरी आणा लागतोय, आधीच सामान्य नागरिक महागाईने हैराण झालेला आहे,

*पुर्वी प्रत्येक गॅस धारकांना वर्षा ला 15 सिलिंडर घरपोच पोच मिळत होते, आज नव्या नियमानुसार 25 दिवसानंतर नविन बुकिंग करता येते, पण हिशोबने ट्याग नंबर येई पर्यंत 30 दिवस होतात, त्यानंतर आठवड्याने गाडी घरपोच पोच आली तर ठीक नाहीतर चलो गॅस एजन्सी, या हिशोब ने सामान्य नागरिकांना वर्षाला 9 सिलिंडर पण मिळणे अशक्य आहे,

*खडे गावातील नागरिकांना 45 दिवसानंतर नवीन बुकिंग म्हणजे खेडे गावातील लोक जेवण करत नाहीत ❓, एक तर जंगलतोड लागू आहे, मग त्यांनी जगायच नाही,

*आता म्हणाल गॅस तुटवडा आहे, पण अनुभवले ली वस्तूस्थिती अशी आहे की काळ्या बाजारात घरगुती सिलिंडर 2200 रूपये आणि व्यावसायिक सिलिंडर 3200 रूपये अगदी बिनधास्तपणे विकला जातोय, हे सिलिंडर पाहिजे तेवढे मिळतात, मग सिलिंडर तुटवडा कसा म्हणता येईल,

*सिलिंडर तुटवड्या च्या नावाखाली काळाबाजार चालत असेल तर मग पुर्वी प्रमाणेच गॅस कार्ड धारकांना वर्षाला 15 सिलिंडर मिळाले पाहिजेत, आणि हॉटेल व्यावसायिकांना सरकारी भावाने जोपर्यंत सिलिंडर मिळणार नाहीत, तो पर्यंत तो तरी काय करू शकणार नाही,

*आज सामान्य कामगार वर्ग वडापाव नाष्टा करायला गेला तर तो ही 10 रुपये वरुन २0 रूपये झाला, मच्छी जेवण 150 रूपये वरून 250 रुपयावर गेलेले आहे, याचे कारण हॉटेल मालकच उघड पणे सांगतात काय करणार 3200 देऊन सिलिंडर खरेदी करतो, या सर्वांचा परिणाम सामान्य नागरिक, सामान्य कामगार वर्ग यांच्या वरच पडतो,

*तरी संबंधित प्रशासकीय अधिकारी वर्गाने वेळी च लक्ष द्यावे , आणि सामान्य कामगार नागरिकांना दिलासा द्यावा,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी केली आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!