*अन्न सुरक्षा विभागाला संपूर्ण जिल्ह्यात वैभववाडीतच सापडला विमल गुटखा ..?*

*अन्न सुरक्षा विभागाला संपूर्ण जिल्ह्यात वैभववाडीतच सापडला विमल गुटखा ..?*

*कोंकण एक्सप्रेस*

*अन्न सुरक्षा विभागाला संपूर्ण जिल्ह्यात वैभववाडीतच सापडला विमल गुटखा ..?*

*जिल्हाभर कारवायांचा दावा*

*वैभववाडी : प्रतिनिधी*

मात्र सिंधुदुर्गात नोंद झाली केवळ वैभववाडीतील कारवाईची  राज्यभर प्रतिबंधित गुटखा व पान मसालाविरोधात अन्नसुरक्षा विभागाने मोहीम तीव्र केली असल्याचा दावा केला जात असला, तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकतीच झालेली कारवाई वैभववाडी तालुक्यातच समोर आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. संपूर्ण जिल्ह्यात अन्नसुरक्षा विभागाला प्रतिबंधित विमल पान मसाला आणि आरएमडी गुटखा केवळ वैभववाडीतच सापडला का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

वैभववाडी शहरातील समर्थ पान शॉपवर टाकलेल्या छाप्यात २ हजार ८३८ रुपयांचा विमल पान मसाला व आरएमडी गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी दुकान मालकाविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मात्र, जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये गुटखा विक्री होत नसल्याचा दावा कोणीही करू शकत नाही. अनेक ठिकाणी खुलेआम गुटखा व पान मसाल्याची विक्री होत असल्याची चर्चा असताना कारवाई मात्र मोजक्याच ठिकाणी होत असल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे अन्नसुरक्षा विभागाने राज्यभर मोहीम सुरू असल्याचे सांगितले असले, तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर प्रमुख बाजारपेठांमध्ये अशाच प्रकारच्या कारवायांची माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे विभागाच्या कारवाईची व्याप्ती आणि सातत्य यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्रतिबंधित गुटखा विक्रीवर प्रभावी नियंत्रण आणायचे असेल तर कारवाई केवळ एका दुकानापुरती मर्यादित न ठेवता जिल्हाभर व्यापक तपासणी मोहीम राबविण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा अन्न सुरक्षा विभागाला संपूर्ण जिल्ह्यात वैभववाडीतच विमल गुटखा सापडला का? हा प्रश्न कायम राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!