*कोंकण एक्सप्रेस*
*ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे कडे आमदार प्रमोद जठार यांची विविध विकासकामांसाठी निधीची मागणी*
*रत्नागिरी : प्रतिनिधि*
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामविकासाच्या विविध कामांबाबत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची आमदार प्रमोद जठार यांनी सविस्तर चर्चा करून विविध विकासकामांसाठी निधीची मागणी केली. यावेळी मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामविकास कामांना गती मिळणार आहे.

