बुधवार, २५ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• वेंगुर्ल्यात महिला शेतकरी प्रमाणपत्र शिबिराला २४९ महिलांचा प्रतिसाद• कट्टा-पेंडूर रस्त्यासाठी ग्रामस्थांना रास्ता-रोको आंदोलन करावे लागते याचे आ. निलेश राणेंनी आत्मपरीक्षण करावे- वंदेश ढोलम• शिंपी समाज ऐक्यवर्धक संघाच्या अध्यक्षपदी अभिजीत मिरजकर• बॉक्सिंग स्पर्धेत आर्य आवटीला कांस्य• सिंधुदुर्गातील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी IACD चा पुढाकार• प्रतिकूल परिस्थितीतही शिवसैनिक पुन्हा शिवसेना उभारतील त्याची सुरुवात तिथवली शाखेपासून झाली- मा.आ. वैभव नाईक• नांदगाव येथे २६ व २७ नोव्हेंबरला ५४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन• पुणे जिल्ह्यातील रिंग रोड व घाटरस्त्यांच्या कामाचा सार्वजनिक उपक्रम समितीकडून पाहणी दौरा• कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या विजयाला दोन वर्षे पूर्ण• कणकवली पंचायत समिती वर्धापन दिन उत्साहात संपन्न• वेंगुर्ल्यात महिला शेतकरी प्रमाणपत्र शिबिराला २४९ महिलांचा प्रतिसाद• कट्टा-पेंडूर रस्त्यासाठी ग्रामस्थांना रास्ता-रोको आंदोलन करावे लागते याचे आ. निलेश राणेंनी आत्मपरीक्षण करावे- वंदेश ढोलम• शिंपी समाज ऐक्यवर्धक संघाच्या अध्यक्षपदी अभिजीत मिरजकर• बॉक्सिंग स्पर्धेत आर्य आवटीला कांस्य• सिंधुदुर्गातील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी IACD चा पुढाकार• प्रतिकूल परिस्थितीतही शिवसैनिक पुन्हा शिवसेना उभारतील त्याची सुरुवात तिथवली शाखेपासून झाली- मा.आ. वैभव नाईक• नांदगाव येथे २६ व २७ नोव्हेंबरला ५४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन• पुणे जिल्ह्यातील रिंग रोड व घाटरस्त्यांच्या कामाचा सार्वजनिक उपक्रम समितीकडून पाहणी दौरा• कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या विजयाला दोन वर्षे पूर्ण• कणकवली पंचायत समिती वर्धापन दिन उत्साहात संपन्न

ट्रॅक्टर अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू एडगाव-आंबेडी येथील दुर्घटना ; तालुक्यात हळहळ

📅 ४ ऑक्टोबर, २०२६👁 ३९
ट्रॅक्टर अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू एडगाव-आंबेडी येथील दुर्घटना ; तालुक्यात हळहळ

*कोंकण एक्सप्रेस*

*ट्रॅक्टर अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू एडगाव-आंबेडी येथील दुर्घटना ; तालुक्यात हळहळ...*

*वैभववाडी : प्रतिनिधी*

ट्रॅक्टरचा पुढील टायर अचानक फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात करुळ-भोयडेवाडी येथील रुपेश हनुमंत पाटील (वय 40) यांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एडगाव-आंबेडी येथे घडली. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

रुपेश पाटील हे आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर (एमएच 07- एएस -7812) घेऊन वैभववाडीहून करुळच्या दिशेने जात होते. राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना एडगाव-आंबेडी नजीक ट्रॅक्टरचा पुढील टायर अचानक फुटला. त्यामुळे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटून तो रस्त्याच्या उजव्या बाजूच्या गटारात जाऊन आदळला. या अपघातात रुपेश पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील युवकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी खासगी वाहनातून रुपेश यांना वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. करुळ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रुपेश पाटील यांच्या आकस्मिक निधनाने करुळ-भोयडेवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, भावजय, पुतणे, बहीणी असा परिवार आहे. या अपघाताचा अधिक तपास वैभववाडी पोलीस करीत आहेत.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

वैभववाडी मधील अधिक बातम्या

अधिक पहा →