रविवार, ४ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम• पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन• मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार• कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब• सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे• चक्रीवादळासारख्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज• शेतक-यांच्या डोळ्यात वर्षभराची भातपीकाची बेगमी नष्ट झाल्याची भिती - हर्षदा वाळके• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम• पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन• मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार• कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब• सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे• चक्रीवादळासारख्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज• शेतक-यांच्या डोळ्यात वर्षभराची भातपीकाची बेगमी नष्ट झाल्याची भिती - हर्षदा वाळके

वैभववाडी शहरात स्वच्छतेचा एल्गार

बाजारपेठेत राबवली स्वच्छता मोहीम *शाळकरी मुले मोठ्या संख्येने सहभागी

📅 ३ ऑक्टोबर, २०२६👁 ०
वैभववाडी शहरात स्वच्छतेचा एल्गार

*कोंकण एक्सप्रेस

*वैभववाडी शहरात स्वच्छतेचा एल्गार

*बाजारपेठेत राबवली स्वच्छता मोहीम

*शाळकरी मुले मोठ्या संख्येने सहभागी

*वैभववाडी : प्रतिनिधी

महात्मा गांधी जयंती निमित्त शुक्रवारी वैभववाडी शहरांमध्ये स्वच्छतेचा एल्गार करण्यात आला. बाजारपेठेमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत शाळकरी मुलेही मोठ्या संख्येने सहभागी झाली होती.

वाभवे- वैभववाडी नगरपंचायत पुढाकाराने अर्जुन रावराणे विद्यालय, वैभववाडी यांच्या सहकार्याने आणि स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग यांच्या सहभागाने ही मोहीम शुक्रवारी राबविण्यात आली. नगरपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात या मोहिमेला सुरुवात झाली. नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. संपूर्ण वैभववाडी शहर स्वच्छ ठेवण्याचा आमचा प्रयत्न नेहमीच राहिला आहे. या मोहिमेमुळे आम्हाला आणखी प्रेरणा मिळाली आहे. शहर स्वच्छ ठेवणे ही जशी नगरपंचायतीची जबाबदारी आहे तशी प्रत्येक नागरिकांनीही जबाबदारी स्वीकारून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहनही नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे यांनी केले.

स्वच्छता मिशनचे समन्वयक पत्रकार गणेश जेठे यांनी सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली. त्यानंतर वैभववाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती जयेंद्र रावराणे, जिल्हा परिषद सदस्य श्रावणी रावराणे, निवृत्त नायब तहसीलदार दिलीप पाटील, सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय सावंत यांनी सर्व नागरिकांनी स्वच्छतेसाठी सहभाग दर्शवावा असे आवाहन केले. शहरातील नागरिकांना पत्रके देऊन स्वच्छतेचे आवाहन केले.

या मोहिमेत अर्जुन रावराणे विद्यालयातील मुले आणि शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्याशिवाय आनंदी रावराणे महाविद्यालयाच्या मुली सुद्धा यावेळी उपस्थित होत्या.

दत्त मंदिर परिसरात पुन्हा एकदा स्वच्छतेची शपथ घेऊन सर्वजण वैभववाडी तहसीलदार कार्यालयाच्या दिशेने निघाले. बाजारपेठ आणि बस स्थानक परिसर साफ केल्यानंतर वैभववाडी पोलीस स्थानक परिसरातही कचरा गोळा करण्यात आला.

यावेळी शाळकरी मुले स्वच्छतेसंबंधीच्या घोषणा जोरजोरात देत होत्या. संपूर्ण बाजारपेठेतील वातावरण स्वच्छतेच्या घोषणांनी भारावून गेले होते.

ही मोहीम दीड ते दोन तास चालली. या मोहिमेत उपनगराध्यक्ष प्रदीप रावराणे, नायब तहसीलदार सचिन कदम, माजी नगराध्यक्ष नेहा माईनकर, अक्षता जैतापकर, महेश संसारे, सुभाष रावराणे, नंदकुमार रावराणे, रणजीत तावडे,उत्तम सावंत, विनायक पाताडे, अनंत राणे,विजय जामदार, अनिल मेस्त्री, पत्रकार संजय सावंत, महेश रावराणे, अश्विनी पेडणेकर संजय शेळके, गुरु सावंत,तुषार नेवरेकर, रोहित मोंडकर, प्रदीप राणे,शेख सर,सतीश घाडी,मोहन पडवळ,मारुती कांबळे, स्वच्छता अधिकारी राघव सावंत आणि अनेक पदाधिकारी नागरिक व स्वच्छता प्रेमी या मोहिमेत सहभागी झाले होते.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

वैभववाडी मधील अधिक बातम्या

अधिक पहा →