माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

*कोंकण एक्सप्रेस*

*माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश*

*कणकवली : प्रतिनिधि*

नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स आणि बालमंदिर कनेडी या प्रशालेत सध्या इयत्ता नववी मध्ये शिकत असलेला कुमार गौरांग अरविंद सावंत याने उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण सर्वसाधारण गटात २३ वा क्रमांक प्राप्त करून ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. त्याच्या या यशामुळे प्रशालेच्या शिरपेतात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याने या शिष्यवृत्ती परीक्षेत ३०० पैकी २०० गुण प्राप्त केले आहेत.

या विद्यार्थ्याला प्रशालेतील शिक्षक श्री. आर्. एन्. भानुसे, श्रीम. साटम एम्. एम्., श्रीम. हाटले पी. एल्., श्रीम. सावंत ए. ए., श्रीम. एस्. एम्. न्हिवेकर, श्री. पी. एन्. मसुरकर, श्री. एम्. पी. मेस्त्री या शिषकांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल गौरांगचे कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचे अध्यक्ष सन्मा. श्री सतीशजी सावंत व सर्व पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन श्री. आर्. एच्. सावंत व सर्व सदस्य, प्रशाला मुख्याध्यापक तथा प्राचार्य सन्मा. श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक सन्मा. श्री. बयाजी बुराण , प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व आजी -माजी विद्यार्थी व पालक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!